आरोग्य

Heart Attack टाळायचा असेल तर रोज खा स्वयंपाकघरातला ‘हा’ पदार्थ

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलती लाइफस्टाईल म्हणजे एका जागी जास्त वेळ बसून काम करणे, शरीराची जास्त हालचाल न करणे, फास्ट फूड खाणे यामुळे लोकांच्या शरीरात हाय कोलेस्टेरॉल खूप वाढत आहे. ज्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. शरीरात जमा झालेल्या कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि त्यामुळे शरीरात सगळीकडे रक्त पुरवठा सरळीत होत नाही. याच कारणानं हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आपल्या किचनमध्येच अशा काही गोष्टी असतात, ज्या वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. औषधं जास्त घेतली तर साइड इफेक्टही होऊ शकतात. अशात किचनमधील एक खास मसाला वापरून तुम्ही कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर काढू शकता. याच खास मसाल्याबाबत डॉक्टर सलीम जैदी यांनी माहिती दिली आहे.

डॉक्टरांनुसार कोलेस्टेरॉल कमी करणारा हा खास मसाला म्हणजे दुसरं काही नाही तर आलं आहे. आल्याच्या मदतीनं तुम्ही शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल बाहेर काढून हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करू शकता. फक्त याचा वापर कसा करावा हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं.

कोलेस्टेरॉल कमी करता आल

गॅस, ब्लोटिंग आणि अपचन अशा समस्या होणं आजकाल फारच कॉमन झालं आहे. कारण खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. जर तुम्हाला या समस्या दूर करायच्या असतील आणि सोबतच शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल, तसेच हार्ट अॅटॅकचा धोका टाळायचा असेल तर आलं तुम्हाला मदत करू शकतं.

धमण्यांना करतं साफ

जगभरात हृदयरोगांमुळे दरवर्षी कोट्यावधी लोकांचा जीव जातो. यात हाय कोलेस्टेरॉल ही सगळ्यात मोठी समस्या आहे. कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक होतात आणि शरीरातील रक्त पुरवठा अडथळीत होतो. ज्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक येतो. अशात नसांमधून कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यासाठी आलं तुमची मदत करतं.

आलं खाण्याची योग्य पद्धत

आलं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं खाऊ शकता. आलं तुम्ही कच्च खाऊ शकता, शिजवून खाऊ शकता, पावडरच्या रूपातही खाऊ शकता. यातील सगळ्यात फायदेशीर पद्धत म्हणजे कच्चं आलं खाणे. आल्याचा एक कच्चा तुकडा घ्या, त्याची साल काढा आणि बारीक करा. अर्धा चमचा आलं जेवणावर वरून टाका किंवा जेवणासोबतच छोटे छोटे तुकडे खाऊ शकता. यानं तुम्हाला अधिक फायदा मिळेल.

उन्हाळ्यात आलं सेफ की नाही

बरेच लोक असा विचार करतात की, उन्हाळ्यात आलं खाणं नुकसानकारक ठरू शकतं. पण जर तुम्ही ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं खाल तर या दिवसातही पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त दिवसातून अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त कच्चं आलं खाऊ नये. जर तुम्हाला काही आजार असेल किंवा औषधं घेत असाल तर आलं खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago