काही स्वस्त गोष्टी मध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. पुढे सांगितल्या प्रमाणे जर सतत ८ दिवस अंघोळ केली, तर आयुष्यात चर्मरोग होणार नाही. अनेक वेळा शरीरावर लहानसहान बॅक्टेरिया असतात, त्यामुळे त्वचेला खाज सुटण्याचे प्रकार होतात, ते देखील बंद होतील.
तुरटी सहज किराणा दुकानात उपलब्ध होते. १० रूपयाला ५० किंवा १०० ग्रॅम तुरटीचा भाव आहे. एका प्लास्टीकच्या बाटलीत तुरटीचे लहान तुकडे करून त्यात पाणी टाका. यानंतर तुरटीचे द्रावण तयार होईल. हे द्रावण अंगाला अशा ठिकाणी लावा, ज्या ठिकाणी घाम जमा होणे, अथवा खाज सुटण्याची शक्यता अधिक असते; जसे डोके, काखेत आणि मांड्यांच्या मध्ये. काखेत तुरटीचे द्रावण लावल्याने दुर्गंधी जाण्यास मदत होते.
तुरटीचे हे द्रावण लावल्या नंतर पाच मिनिटात सुकते. सुकल्यानंतर पांढरे स्फटीक स्पष्ट दिसतात, यानंतर अंघोळ करा. अशी आंघोळ सतत ८ दिवस आणि वर्षभरात ४ वेळा केल्यास, गजकर्ण, नायटा यासारखे आजार अजिबात होणार नाहीत. शिवाय शरीराची दुर्गंधी येणार नाही, केसांत चाई देखील होणार नाही. आंघोळ करताना तुरटीचे पाणी डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. हे पाणी डोळ्यात गेल्यास जळजळ होते, यासाठी डोके धुतांना डोळे घट्ट मिटा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…
शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान जमिनीवर अवैधरित्या वाळूचा साठा केला असल्याचा…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…