आरोग्य

डोळ्यांसाठी अत्यंत आवश्‍यक व महत्वाची अशी काही पोषणमुल्ये

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये पुढील अन्नपदार्थातून मिळतात.

1) केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या:- जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुवतपणा येण्याची शक्‍यता असते.

2) आंबट व बेरी प्रकारातील फळे:- जीवनसत्व क हे आंबट फळे जसे आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादीमध्ये तसेच स्ट्रॉबेरी, शृजबेरी, रासबेरी मध्ये पण असते. सर्वसाधारणपणे संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून ही जीवनसत्वे सैनिकासारखे आपले रक्षण करत असतात. डोळ्यांच्या संसर्गापासून रक्षण व मोतीबिंदूची शक्‍यता बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे काम क जीवनसत्व करते.

3) सुका मेवा:- ई जीवनसत्व हे अँटीऑक्‍सिडंट्‌सचे काम करते. जीवनसत्व अ चे ऑक्‍सिडेशन होण्यापासून वाचवते. आपण जसे घर घासून पुसून साफ करतो, किटाणूंचा कचऱ्याचा सफाया करतो, तसेच हे अँटीऑक्‍सिडंट्‌स फ्री रॅडीकल चा सफाया करतात. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया, हवेचे प्रदूषण, सिगारेट ओढणे इत्यादींमुळे फ्री रॅडीकल्स तयार होतात. बदाम, अंड, वनस्पतीजन्य तेल इत्यादी मध्ये ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते.

4) पालेभाज्या:- हिरव्या पालेभाज्यांमध्ये अम्प्युटीन, झॅकसंथीन हे अँटीऑक्‍सिडंट्‌स भरपूर प्रमाणात असतात. स्नायूंच्या ऱ्हासाची व मोतीबिंदूची शक्‍यता कमी करण्यात यांचा महत्वाचा वाटा आहे. स्नायूंचा ऱ्हास ही सर्व वयस्क लोकांमध्ये आढळून येणारी अवस्था आहे. रेटीनाचा मधला भाग काम करेनासा होतो. हे टाळण्यासाठी भरपूर पालेभाज्या मिक्‍स असलेले सलाड खाणे आवश्‍यक आहे.

5) अंडे:- अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कॅरोटीन व ल्युपिन हे दोन्ही डोळ्यांसाठी आवश्‍यक असलेले पोषणमूल्य असतात. त्यामुळे रेटीना तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

6) मासे:- ट्युना, साल्मन इत्यादी प्रकारचे मासे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यासाठी हे मासे, तसेच आक्रोड, सोयाबीनची उत्पादने, या सगळ्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा जातो. डोळे तजेलदार दिसतात.*

7) झिंक:- झिंक हे खनिज मदतनिसाचे काम करते. आपल्या यकृतात साठवलेले जीवनसत्व अ यकृताकडून डोळ्याच्या रेटीना पर्यंत आणण्याचे काम झिंक हे खनिज करते. काही फळे, भाज्या व मुख्यत्वे प्राणिज पदार्थ व मासे यात झिंक असते. समतोल आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, स्वच्छता तसेच पोषकतत्वांचा आहारात समावेश करण्यासोबतच काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

8) डोळ्यासाठी उन्हाच्या चष्म्याचा वापर करा:-  फॅशन म्हणून नव्हे, तर सुर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी गॉगल वापरावा. भरपूर पाणी प्यावे. आपला डोळा पाण्यासारख्या पदार्थाने वेढलेला आहे. आपण जितके वेळा पापणी उघडझाप करतो, तितके वेळा धुळीचे कण व इतर गोष्टी डोळ्यात जात असतात पण हा पातळ पदार्थ आपल्या डोळ्याचे सतत रक्षण करत असतो व डोळ्याला कोरडेपण जाणवू देत नाही.

भडक रंगाच्या भाज्यांचे सलाड आहारात नक्कीच असावे. जसे पालक, बीट, कोथिंबीर, गाजर इ. हे सलाड अनेक गोष्टी एकत्र करून खावे. उदाहरणार्थ भाजी, फळे, थोडा सुकामेवा, कडधान्य, ऑलिव्ह तेल इत्यादी एकत्र खावे. डोळ्यांना कटाक्षाने आराम द्यावा. यासाठी 20-20-20 चा नियम पाळावा. दर 20 मिनिटांनी 20 फुट लांबीची वस्तू, 20 सेकंदांसाठी पाहावी यामुळे काम करताना डोळ्यावर येणारा ताण हलका होतो व डोळ्याचे आरोग्य राखले जाते.

(सोशल मीडियवरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

7 सेकंद ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

6 मिनिटे ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

10 मिनिटे ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

17 मिनिटे ago

इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…

24 मिनिटे ago

पदविका विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय!

MSBTE कडून अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओ आणि संगणक केंद्राची उभारणी मुंबई.: पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या…

28 मिनिटे ago