आरोग्य

लहान मुलं आणि गर्भवती महिलांसाठी घातक ठरू शकतं नळाचं पाणी

भारतात भरपूर घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. काही लोक हे पाणी फिल्टर करून वापरतात तर काही लोक फिल्टर न करता पितात. अलिकडेच कोलंबिया विश्वविद्यालयात करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, अमेरिकेतील नळाच्या पाण्यातील आर्सेनिक नावाचं विषारी तत्व महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या बाळासाठी खूप नुकसानकारक ठरू शकतं. रिसर्चनुसार, भलेही पाण्यात आर्सेनिकचं प्रमाण कमी असेल, पण तरी सुद्धा ते गर्भवती महिला आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी घातक ठरू शकतं.

अमेरिकेत साधारण २८ कोटी लोक सार्वजनिक पाणी पुरवठा व्यवस्थेवर अवलंबून आहे. अशात बऱ्याच लोकांचा जीव धोक्यात आहे. या रिसर्चनुसार, नळाचं पाणी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं मानता येत नाही. खासकरून गर्भवती महिला आणि लहान मुलांचा विषय येतो तेव्हा. अशात सगळ्यांनीच या समस्येवर लक्ष देण्याची गरज आहे.

काय आहे आर्सेनिक

आर्सेनिक एक विषारी तत्व आहे, जे जमिनीत असतं. खासकरून डोंगराळ भाग आणि मातीमध्ये नॅचरल रूपानं आढळतं. हे मातीमधून पाण्यात मिक्स होऊ शकतं. जे नंतर नळाच्या पाण्यात येतं. अमेरिकेतील सगळ्याच ५० राज्यांतील सार्वजनिक पाणी पुरवठा व्यवस्थेत आर्सेनिक आढळून आलं आणि अंदाज आहे की, यानं २० कोटी लोक प्रभावित होऊ शकतात.

आर्सेनिक घातक कस

आर्सेनिक गर्भवती महिला आणि नवजात बाळांसाठी घातक असतं. रिसर्चमध्ये आढळून आलं की, पाण्यात आर्सेनिक थोडं तरी असलं तरी वेळेआधीच बाळाचा जन्म होण्याचा धोका होऊ शकतो. यामुळे कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं. तसेच या बाळांना आयुष्यभर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

आर्सेनिकचं किती प्रमाण सुरक्षित

अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा संस्थेनुसार, पाण्यात आर्सेनिकचं जास्तीत जास्त १० मायक्रोग्रॅम प्रति लीटर प्रमाण सुरक्षित मानलं जातं. पण या रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की, केवळ ५ मायक्रोग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी आर्सेनिक सुद्धा बाळांसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

कसा करावा बचाव

पब्लिक हेल्थ प्रोटेक्शनसाठी नळाच्या पाण्यातील आर्सेनिकच्या प्रमाणाबाबत जी सीमा सरकारनं ठरवली आहे, ती आणखी कमी केली पाहिजे. जेणेकरून आरोग्य बिघडू नये. नळाचं पाणी नेहमी चेक केलं पाहिजे. खासकरून गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी फिल्टरच्या पाण्याचा वापर केला पाहिजे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा नवी दिल्ली:…

12 तास ago

शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा…

13 तास ago

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…

16 तास ago

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

18 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

18 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

18 तास ago