आरोग्य

हृदय फिट आहे की नाही, घरी ‘अशी’ करा सोपी टेस्ट, म्हातारे होईपर्यंत तब्येत ठणठणीत

आजकालच्या धावपळीच्या जीवनात असलेला हृदयरोगांचा धोका एक चिंतेचा विषय आहे. आधी हृदयरोग हा वृद्ध लोकांनाच होणारा आजार समजला जात होता. पण आजकाल कमी वयातही लोकांना वेगवेगळ्या हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, तुमचं हृदय निरोगी आहे की नाही. एक सोपी टेस्ट करून तुम्ही तुमच्या हृदयाचं आरोग्य आणि भविष्यात हार्ट अ‍ॅटॅकच्या धोक्याबाबत जाणून घेऊ शकता. याला “सिटिंग-रायजिंग टेस्ट” म्हटलं जातं. चला तर जाणून घेऊ या टेस्टबाबत आणि ती करून हृदयाची स्थिती कशी जाणून घ्याल.

काय आहे सिटिंग-रायजिंग टेस्ट

ही टेस्ट फारच सोपी आहे आणि ही तुम्ही घरीच करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ जमिनीवर बसायचं आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय उठायचं आहे. या टेस्टचा स्कोर तुमचा फिजिकल बॅलन्स, स्नायूंची शक्ती आणि फ्लेक्सिबिलिटीला दर्शवतो. या गोष्टी थेट हृदयाशी संबंधित आहे. केवळ हृदयाचंच आरोग्य नाही तर यातून पूर्ण शरीराच्या आरोग्याबाबत माहिती मिळते.

कशी कराल टेस्ट

कोणत्याही सपाट जागेवर कोणत्याही आधाराशिवाय सरळ उभे रहा. त्यानंतर हळूहळू जमिनीवर मांडी घालून बसा. खाली बसत असताना हातांनी गुडघ्यांचा आधार घेऊ नका. आता कोणत्याही आधाराशिवाय उभे रहा. जर तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय खाली बसू शकत असाल आणि उभे राहू शकत असाल तर हा तुमचं हृदय फिट असल्याचा संकेत आहे. पण जर बॅलन्स ठेवण्यात अडचण येत असेल किंवा हातांचा आधार घ्यावा लागत असेल तर हा शारीरिक कमजोरी आणि हृदयरोगाच्या धोक्याचा इशारा आहे.

टेस्ट आणि हृदयरोगाचं कनेक्शन

या टेस्टच्या माध्यमातून फिजिकल बॅलन्स, कोर स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी चेक करता येते. जर तुमचं शरीर फ्लेक्सिबल आणि मजबूत असेल, तर यातून हे कळतं की, तुमचे स्नायू आणि नर्व्स हेल्दी आहे, ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. कमजोरी स्नायू आणि खराब बॅलन्समुळे हृदयरोगांचा धोका वाढतो.

हृदय कसं निरोगी ठेवाल?

रोज किमान ३० मिनिटं वॉक किंवा योगा करा.

आहारात फळं, भाज्या, कडधान्य यांचा समावेश करा.

स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर रहा

तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago