मुख्य बातम्या

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अज्ञातांनी टाकले गतिरोधक; वाहनचालक संतप्त

न्हावरे (तेजस फडके) करडे-रांजणगाव गणपती या अष्टविनायक महामार्गांवर अज्ञात व्यक्तीने रातोरात अनधिकृतरीत्या गतिरोधक टाकल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. गुरुवार दि ११ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री रस्त्यावर सिमेंट काँक्रीट टाकुन दोन ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. या गतिरोधकांची उंची जास्त असल्यामुळे अनेक चारचाकी वाहनाची खालची बाजु या गतिरोधकाला घासत असुन त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत.

खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गालगतच असणाऱ्या एका विजेच्या खांबाला बुधवार दि १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ च्या दरम्यान करडे येथुन रांजणगावच्या दिशेने एकामागोमाग एक जात असलेल्या दोन हायवा ट्रक पैकी एका हायवा ट्रकने जोरदार धडक दिली. हायवा ट्रक धडकल्यानंतर विजेचा खांब मधोमध तुटला आणि मोठा आवाज झाला. त्यानंतर ट्रक चालकाने हायवा पाठीमागे घेत जोरात पुढे पळ काढला.

त्यावेळेस रस्त्यालगत राहणारे स्थानिक नागरिक घाबरुन घराबाहेर पळाले. या रस्त्यावर आजपर्यंत अनेकवेळा गंभीर स्वरुपाचे अपघात झालेले आहेत. याबाबत स्थानिक लोकांनी वेळोवेळी पाठपुरावाही केलेला आहे. परंतु या घटनेमुळे संतप्त झालेल्या काही स्थानिक अज्ञात लोकांनी गुरुवार (दि ११) रोजी मध्यरात्री रातोरात डांबरी रस्ता उकरुन दोन ठिकाणी गतिरोधक टाकले. परंतु त्यांची उंची जास्त असल्याने आणि हा महत्त्वाचा वर्दळीचा मार्ग असल्याने अनेक चारचाकी वाहनांची खालची बाजु या उंच गतिरोधकाला घासल्याने त्यांचे नुकसान झाले. त्यामुळे वाहनचालक संतप्त झाले आहेत.

स्थानिकांना कायदा हातात घ्यायची वेळ का आली…?

या महामार्गावरुन शिरुर, पुणे तसेच रांजणगाव एमआयडीसीकडे जाणारी वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकृत परवानगीशिवाय रस्त्यावर उंचसखल गतिरोधक बसवण्यात आल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले असुन तर एका चारचाकी वाहनाचा ऑईल चेंबर फुटल्याची प्राथमिक माहिती आहे. या रस्त्याच्या लगतच राहणाऱ्या स्थानिकांनी या रस्त्यावर वेळोवेळी अपघात होत असुन याठिकाणी गतिरोधक बसविण्यासाठी संबंधित खात्याकडे पाठपुरावा करुनही त्यावर काहीच उपाययोजना न झाल्याने आणि याच रस्त्यावर हायवा लाईटच्या खांबाला धडकल्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी कायदा हातात घेत रातोरात सिमेंट काँक्रेटचे गतिरोधक टाकले. त्यामुळे यात आता नक्की चुक कोणाची असा प्रश्न पुढे येत आहे.

हायवा ट्रक चालकावर गुन्हा दाखल; पण कारवाई होणार का…?

करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या लगत असणाऱ्या विजेच्या खांबाला धडकलेला हायवा ट्रक हा गावातीलच एका व्यक्तीचा असल्याची खात्रीलायक सूत्रांकडुन माहिती मिळाली आहे. मात्र विजेच्या खांबाला धडक दिल्यानंतर हायवा चालक वेगात रांजणगावच्या दिशेने पळुन गेलेला आहे. याबाबत न्हावरे येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता संबंधित चालकावर कारवाई करणार का…? तसेच कायदा हातात घेणाऱ्या आणि कायद्याची पायमल्ली करत रातोरात अनधिकृत गतिरोधक टाकणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी कारवाई करणार का…? असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.

रांजणगाव गणपती येथे तरुणावर सहा जणांचा जीवघेणा हल्ला

रांजणगाव येथे शेतजमीनीच्या वादातुन जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधी तक्रार दाखल

शिरुरच्या स्वयंघोषित नेत्याने महसुलमंत्र्याकडे तक्रार करत महसुल व पोलिसांवर टाकला दबाव…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

22 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

22 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago