आरोग्य

सकाळी झोपेतून लवकर उठण्याचा सगळ्यात मोठा फायदा

वाढती स्पर्धा, कामाचा वाढता ताण, धावपळ, योग्य आहार न घेणे, चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल भरपूर लोकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यात सर्वात जास्त लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वात जास्त कशाचा फटका बसत असेल तर ते आहे डिप्रेशन. डिप्रेशन ही समस्या तरूणांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते. यावर वेगवेगळे उपायही आहेत. या उपायांमध्ये आणखी एका रिसर्चची भर पडली आहे.

झोपेतून लवकर उठण्याचा फायदा

ज्या लोकांमध्ये अनुवांशिक रूपाने सकाळी लवकर उठण्याची सवय असते, त्यांचं मानसिक आरोग्यही चांगलं असतं. या लोकांना सिजोफ्रेनिया आणि डिप्रेशनसारखे मानसिक विकार होण्याचा धोकाही कमी असतो. नेचर कम्युनिकेशन नावाच्या एका मॅगझिनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये बॉडी क्लॉक संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे की, सकाळी लवकर उठणे याचा मानसिक आरोग्य आणि आजारांशी कसा संबंध आहे.

मेंदुची क्षमता वाढते

सकाळी आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाच्या हार्मोनची निर्मिती अधिक होत असते. या हार्मोनच्या मदतीने स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे सकाळी झोपेतून लवकर उठल्याने दिवसभर आपलं शरीर तणावमुक्त राहतं. तसेच सकाळी फ्रेश हवेत श्वास घेतल्याने मेंदुमध्ये रक्तसंचार वाढतो ज्यामुळे विचार करण्याची, समजण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता अधिक वाढते.

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

सकाळी लवकर उठल्याने स्वच्छ ऑक्सिजन मिळतं. यामुळे श्वासासंबंधी समस्यांपासून आराम मिळतो आणि फफ्फुसंही चांगले राहतात.

सकाळी उठून व्यायाम केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे हृदय निरोगी राहतं.

अनेक मानसिक आजारांपासून बचाव होतो. तसेच सकाळी उठून योग्याभ्यास करण्याचेही अनेक फायदे आहेत.

सकाळी लवकर उठल्याने दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं, यामुळे काम करण्यात अधिक लक्ष लागतं. म्हणजे कामही चांगलं होतं आणि आनंदही मिळतो.

सकाळी जबरदस्तीने उठण्याचे नुकसान 

ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीतील संशोधिका कॅथरीना वुल्फ यांच्यानुसार, जेव्हा एखाद्याला जबरदस्तीने त्याच्या बॉडी क्लॉक विरूद्ध सकाळी लवकर उठण्यास किंवा जागण्यास सांगितलं जातं तेव्हा, याचाही वाइट प्रभाव पडतो. शरीरासोबत केलेली जबरदस्ती कधीही फायद्याची ठरत नाही. लोकांना त्यांच्या सिर्काडियन क्लॉक म्हणजेच शरीराच्या जैविक घड्याळीप्रमाणे सगळं करू दिलं, तर त्यांचं परफॉर्मंन्स चांगलं होतं. रात्री उशीरापर्यंत जागणाऱ्याला सकाळी लवकर उठण्यास सांगण्यात आलं तर त्याला आळस आलेला असेल. त्याचं कामात अजिबात लक्ष लागणार नाही. मेंदुचाही वापर तो चांगल्याप्रकारे करू शकणार नाही आणि अशात त्याचं वजन वाढू शकतं.

सकाळी झोपेतून लवकर उठण्यासाठी काय करावे

उशीरा झोपण्याची सवय बदला

रात्री उशीरा झोपल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायला तुम्हाला शक्य होत नाही. मग या गोष्टीची तुम्हाला सवयच लागते. सर्वप्रथम ही सवय बदला. रात्री झोप येत नसेल तर रात्री एक ग्लास कोमट दूध घ्या. थोडं चला. ज्यामुळे तुम्ही लवकर झोपू शकाल.

प्रयत्न सोडू नका 

जर तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुम्हाला सकाळी जाग आली नाही, तर लगेच धीर सोडू नका. तुमच्या शरीराला उशीरा उठण्याची सवय लागली आहे. ही सवय मोडायला थोडा वेळ लागेल. जरी पहिल्या दिवशी तुम्हाला वेळेत जाग आली नाही तरी आठवडाभर प्रयत्न केल्यास तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागेल.

आधी छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा 

सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करण्यासाठी आधी छोटे छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पहिल्या दिवशी नेहमीच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी झोपा व दुसऱ्या दिवशी १५ मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. मग दुसऱ्या दिवसापासून ३० मिनिटे आधी झोपा व ३० मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा.

दुपारी झोप घेण्याचे टाळा

कधीही दुपारी झोपू नका. कारण दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे पुन्हा सकाळी लवकर जाग येत नाही. दुपारची झोप टाळण्यासाठी स्वत:ला इतर गोष्टीत किंवा तुमच्या आवडीच्या छंदामध्ये गुंतवा..

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

11 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

11 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

15 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

15 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

15 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

15 तास ago