आरोग्य

कोणतं तेल खाल्ल्यानं वजन वाढतं आणि कोणत्या तेलानं कमी होत

भारतात तेलाचा वापर रोज वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तेलाशिवाय अनेक पदार्थांचा किंवा भाज्यांचा विचारही केला जाऊ शकत नाही. तेल शरीरासाठी आवश्यकही असतं, पण याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास शरीरात चरबी वाढून लठ्ठपणा वाढतो आणि सोबतच हृदयरोगांचा धोकाही वाढतो. यामुळे डॉक्टर नेहमीच तेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला देत असतात. अशात कोणतं तेल आरोग्याचं नुकसान करणार नाही किंवा कोणतं तेल घातक असत, असा प्रश्न मनात येणं सहाजिक आहे.

कोणतं तेल फायदेशीर

खाण्यासाठी मोहरीचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल सगळ्यात बेस्ट तेल आहेत. या तेलांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतं. जे हृदयासाठी खूप जास्त फायदेशीर असतं. हृदयासंबंधी अनेक समस्या कमी करण्यास मोहरीच्या तेलानं मदत मिळते.

मोहरीच्या तेलाचा स्मोक पॉइंट जास्त असतो म्हणजे हे तेल जेव्हा जास्त गरम होतं तेव्हाच याची संरचना खराब होते. मोहरीच्या तेलात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं, जे मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर असतं. या तेलात अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे नुकसानकारक बॅक्टेरिया नष्ट करतात. मोहरीचं तेल त्वचा आणि केसांसाठी फार चांगलं असतं. या तेलानं शरीरातील वेदना दूर होते.  मोहरीच्या तेलानं पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

ऑलिव्ह ऑइलचे फायदे

ऑलिव्ह ऑइलमध्येही अनसॅच्युरेटेड फॅट असतं. जे हृदयासाठी फायदेशीर असतं. यानं रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका कमी होतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा असतं. जे शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांमध्ये मदत करतं.

इतर फायदेशीर तेल

मोहरीचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल खाण्यासाठी सगळ्यात चांगले असले तरी, त्यासोबतच तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल, सूर्यफुलाचं तेल सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

कोणत्याही प्रकारच्या व्हेजिटेबल तेलाला कधीही जास्त गरम करू नये. जर तेल जास्त गरम केलं तर त्याचं शॉर्ट चेन फॅटी अॅसिड तुटेल आणि ते ऑक्सीडाइन होऊ लागले. ज्यामुळे इन्फ्लामेशन वाढेल.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago