आरोग्य

वजन वाढल्यावर दुर्लक्ष करू नका नाहीतर होऊ शकतो हा गंभीर आजार

आजकाल जास्तीत जास्त महिला लठ्ठपणाच्या शिकार होत आहेत. मात्र, काही केसेसमध्ये लठ्ठपणा हा लठ्ठपणा नसून काही गंभीर आजारही असू शकतो. लिपिडेमा हा यासंबंधी असाच एक आजार आहे. जो महिलांमध्ये भरपूर वाढत आहे. या स्थितीत शरीराच्या काही अवयवांमध्ये भरपूर फॅट सेल्स जमा होऊ लागतात. खासकरून पाय, कंबर आणि त्या खालचा भाग. यामुळे शरीराच्या खालच्या भागाचा आकार मोठा दिसू लागतो.

लिपिडेमा ही समस्या केवळ महिलांना प्रभावित करते आणि ही समस्या किशोरावस्था, गर्भावस्था किंवा मोनोपॉज दरम्यान होते. लिपिडेमा यूकेचा अंदाज असा आहे की, १० पैकी एका महिलेला हा आजार होतो. अशात ही समस्या मॅनेज करण्यासाठी काय करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

लिपिडेमाची लक्षण

लिपिडेमाच्या पहिल्या टप्प्यात त्वचेवर गाठी दिसू लागतात. पण बाहेरून त्वचा मुलायम दिसते. या गाठी संवेदनशील असतात आणि सहजपणे त्यांना इजा होऊ शकते. दुसऱ्या टप्प्यात त्वचेवर छोटे छोटे खड्डे दिसू लागतात. तर तिसऱ्या टप्प्यात मोठे आणि असमान फॅट डिपॉझिट्स दिसू लागतात. मांड्या आणि गुडघ्यांजवळ हे अधिक दिसतात.

रूटीन बिघडत

लिपिडेमामुळे जॉइंट्समध्ये वेदना आणि प्रभावित अवयवांमध्ये जडपणा जाणवतो. कालांतरानं चालण्या-फिरण्यात समस्या होते आणि जॉइंट्सच्या समस्याही वाढतात.

काय आहेत उपचार

लिपिडेमा एक अशी स्थिती आहे, ज्यात शरीराच्या फॅट पेशी प्रमाणापेक्षा जास्त जमा होऊ लागतात. त्यामुळे सामान्य फॅट लॉस उपाय जसे की, डाएट आणि एक्सरसाईजनं यावर काही परिणाम होत नाही. योग्य आहार आणि एक्सरसाईजनं ही समस्या अधिक वाढण्यापासून रोखली जाऊ शकते. सध्या तरी लिपिडेमावर कोणताही ठोस उपाय नाही.

लक्षणं कमी करण्याचे उपाय

कंप्रेशन गारमेंट्स- हे अशा लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं ज्यांना वेदना आणि जडपणा अधिक जाणवतो. हे जॉइंट्सना सपोर्ट करतात आणि सूज कमी करण्यास मदत मिळते.

मॅन्युअल लिंफॅटिक ड्रेनेज- हा आणखी एक उपाय आहे. जो लिपिडेमाची लक्षणं करण्यास मदत करतो.

लिपोसक्शन- लिपिडेमावर उपचार करण्यासाठी लिपोसक्शन हा एक पर्याय आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…

3 तास ago

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…

3 तास ago

शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…

1 दिवस ago

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

2 दिवस ago