महाराष्ट्र

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना दिलासा

१६ जानेवारीपासून सर्व प्रकारच्या उसाला प्रतिटन १०० रुपये अनुदान

बारामती: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दिनांक १६ जानेवारीपासून कारखान्यात गाळपासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या उसाला (आडसाली, सुरू, पूर्वहंगामी व खोडवा) प्रतिटन सरसकट १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

या निर्णयाची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली. कार्यक्षेत्रातील आडसाली उसाचे वाढलेले क्षेत्र आणि ऊस तोडीस होणारा विलंब लक्षात घेऊन सभासदांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे १६ जानेवारीपासून गाळपास येणाऱ्या उसाला सभासदांना एकूण ३२०१ रुपये प्रतिटन दर मिळणार आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ यांच्यासह कार्यकारी संचालक अशोक जाधव आणि जनरल मॅनेजर हनुमंत करवर उपस्थित होते.

दरम्यान, जळीत ऊस मोठ्या प्रमाणात येत असल्याने साखर उताऱ्यावर परिणाम होत असल्याचे सांगत, १६ जानेवारीपासून जळीत उसास प्रतिटन २०० रुपये नुकसान भरपाई कपात करण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे.

कारखान्याचे ऊस गाळप व साखर उतारा वाढल्याशिवाय आर्थिक स्थिती सुधारणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत, “माझा कारखाना, माझी जबाबदारी” ही भावना ठेवून सभासदांनी चांगल्या प्रतीचा ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही कारखाना प्रशासनाने केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

9 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

24 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago