आरोग्य

केसांमधील कोंडा नि मेहंदीचा वापर

केसात कोंडा होण्याची समस्या केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांना देखील होते. उन्हाळ्यात तर धूळ, घाम आणि उन्हामुळे केसात जास्त कोंडा होतो. शॅम्पूने केसातील कोंडा दूर करता येतो. सोबतच काही घरगुती उपायांचा वापर करूनही केसांमधील कोंडा दूर करता येतो. यासाठी मेहंदी मध्ये काही गोष्टींचा वापर करावा लागेल. याने कोंडाही दूर होईल आणि केसही मजबूत व चमकदार होतील. चला जाणून घेऊ कसे तयार कराल खास हेअर पॅक.

1) मेथीच्या बीया: मेथीच्या बियात निकोटिनिक अ‍ॅसिड असतं. जे बॅक्टेरिया सोबत लढण्यास आणि डॅंड्रफ साफ करण्यास मदत करतात. मेहंदी आणि मेथीच्या बियांचं मिश्रण लावलं तर केसगळतीही कमी होते, केस चमकदारही होतात. यासाठी दोन चमचे मेथीच्या बीया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बीया बारीक करा. आता एका वाटी मध्ये ४ चमचे मेहंदी पावडर घाला. यात मेथीची पेस्ट आणि २ चमचे ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावा. साधारण अर्ध्या तासा नंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.

२) मेहंदी मध्ये लिंबू, योगर्ट: बाजारातून फ्रेश मेहंदी घेऊन किंवा मेहंदी पाने सुकवून त्याची पावडर करा. बाजारात मिळणारी केमिकल्स युक्त मेहंदी पावडरचा वापर न केल्यास योग्य होईल. एका वाटी मध्ये ४ चमचे मेहंदी पावडर, एका लिंबाचा रस आणि गरज असेल तर योगर्ट टाका. आता हा हेअर पॅक केसांच्या मुळापासून लावा. ३० मिनिटे हा पॅक तसाच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने केस धूवा. त्यानंतर कमी केमिकल असलेल्या शॅम्पूने केस धूवा.

३) मेहंदी आणि अंडे: एका वाटीत ३ चमचे मेहंदी पावडर, एक चमचा ऑलिव ऑइल, २ अंडी आणि गरजेनुसार पाणी टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण तयार करताना ही काळजी घ्या की, मेहंदी अंड्यामुळे घट्ट होऊ नये. हा हेअर पॅक डोक्याची त्वता आणि केसांवर लावा. हा हेअर पॅक सुकल्या नंतर शॅम्पूने केस धुवा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago