आरोग्य

रात्री चांगली झोप लागावी म्हणून शरीरातील ‘हे’ अवयव दाबून बघा, लगेच येईल गाढ झोप

रोज रात्री चांगली झोप घेणं आपल्या तब्येतीसाठी खूप महत्वाची असते. पण जर रोज झोप येत नसेल तर हे आजारपणाचं एक लक्षण आहे. यामुळे शरीर दिवसभर थकलेलं, सुस्त वाटतं आणि माणूस लवकर वृद्ध होऊ लागतो. झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रोजचं बिघडलेलं रूटीन. बदलत्या आणि बिझी लाइफस्टाईलमुळे लोकांना आपला थकवा घालवता येत नाही. दिवसभर कष्ट करूनही अस्वस्थतेमुळे गाढ झोप येत नाही आणि त्यामुळे शरीर अनेक आजारांनी वेढलं जातं. जर एखाद्याला झोप न येण्याची समस्या असेल तर शरीराच्या काही खास बिंदूंवर दाब दिल्याने गाढ झोप लागू शकते.

कोणते बिंदू दाबल्याने झोप चांगली लागते

झोप यावी यासाठी शरीराच्या काही ठराविक भागांवर दाब देण्याच्या प्रक्रियेला अ‍ॅक्युप्रेशर म्हणतात. ही एक प्राचीन चिनी उपचार पद्धत आहे, ज्यामध्ये शरीराच्या विशिष्ट बिंदूंना दाब देऊन आराम आणि झोप मिळवता येते. खाली दिलेले ४ प्रेशर पॉइंट्स झोप आणण्यासाठी उपयोगी आहेत.

कानामागचा भाग

जर चिंता किंवा डोकेदुखीमुळे झोप लागत नसेल, तर कानाच्या मागील भागावर हलक्या हाताने १० ते २० वेळा दाब द्या. या बिंदूला ‘अनमियन’ म्हणतात. हे बिंदू झोप लवकर आणण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

भुवयांच्या मधला भाग

अनेकदा टेन्शन किंवा ब्लड प्रेशर वाढल्यामुळे झोप लागत नाही. अशा वेळी भुवयांच्या मधल्या भागावर हलका दाब द्या. हा बिंदू मानसिक शांतता वाढवतो आणि झोप लवकर आणण्यास मदत करतो.

मानेखालील भाग

मालिश करताना जेव्हा मानेवर हलके हात फिरवले जातात, तेव्हा झोप यायला लागते. कारण मानेच्या वरच्या भागात एक विशेष बिंदू असतो. अंगठ्याने हलका दाब दिल्यास लगेच आराम मिळतो आणि झोप येऊ लागते. हा बिंदू रिलॅक्सेशन पॉइंट म्हणून ओळखला जातो.

हातावरील बिंदू

हाताच्या बोटांमध्येही झोप आणणारे पॉइंट्स असतात. बोटांपासून मनगटापर्यंत हळुवार दाब द्या. यामुळे नर्व्ह सिस्टीमला आराम मिळतो आणि शरीर शांत होऊन झोप लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago