आरोग्य

हर्निया म्हणजे काय ?

हर्नियाचे प्रकार

१) इनगुईनल हर्निया:- हर्नियाचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे. एक रिसर्चनुसार, सर्व आढळणाऱ्या हर्निया मध्ये ७०% प्रमाणात हा आढळतो. हा तेव्हा होतो जेव्हा आतड्यातील कमकुवत ठिकाणी किंवा पोटातील आतल्या बाजून सूज येते. या प्रकारचा हर्निया महिलांच्या तुलनेतर पुरुषांमध्ये जास्त आढळतो.

२) हाईटल हर्निया:- हा हर्निया तेव्हा होतो जेव्हा पोटाचा भाग छातीच्या पिंजऱ्यातून डायाफ्रामच्या माध्यमातून निघतो. डायाफ्राम म्हणजे मासंपेशींची एक चादर आहे जी फुफ्फुसांना हवा आत घेण्यास मदत करते. या हर्नियाच्या प्रकारात पोटाचा भागात हे छातीपासून वेगळं करतं. या प्रकारचा हर्निया ५० वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. एखाद्या मुलामध्ये हे स्थिती आढळल्यास हा साधारणतः जन्मजात दोष असतो. हा हर्निया नेहमी गॅस्ट्रोएस्फॉजन रिफ्लक्स मागील कारण बनतो. ज्यामुळे जळजळ होऊ लागते.

३) अंबिलिकल हर्निया:- हा हर्निया ६ महीन्या पेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळतो. हा तेव्हा होतो जेव्हा त्यांची आतडी पोटाच्या त्वचेच्या आधाराने खालच्या बाजूला वाढतात. अशावेळी मुलाच्या बेंबी आणि आसपासच्या भाग उठावदार दिसू लागतो. खासकरून अशी मुलं रडताना हे जास्त दिसून येतं. हा एकमेव असा हर्निया आहे जो आपोआप दूर होतो. कारण हळूहळू मुलांच्या पोटातील मांसपेशी मजबूत होत जातात. साधारणतः मुल एक वर्षाची असे पर्यंत हा हर्निया दूर न झाल्यास, तो बरा करण्यासाठी सर्जरी करावी लागते.

४) इंसिजनल हर्निया:- पोटाच्या सर्जरी नंतर हा हर्निया होऊ शकतो. तुमच्या आतडीला पाडलेली चिर किंवा त्याच्या आसापासच्या भागात कमकुवत टीश्यूंच्या माध्यमातून धक्का लागू शकतो, ज्यामुळे हा हर्निया होऊ शकतो.

हर्निया होण्याची कारण

हर्निया मांसपेशींचा कमकुवतपणा आणि तणाव यामुळे होतो. या कारणांनुसार हर्निया कधी लवकर तरी कधी बऱ्याच कालावधी नंतर विकसित होऊ शकतो.

गर्भात असताना पोटाची वाढ योग्यरित्या न झाल्यास असा दोष जन्मजातच दिसून येतो.

खूप काळापर्यंत होणाऱ्या जुन्या खोकल्याच्या त्रासामुळेही हर्निया होऊ शकतो.

एखाद्या जखमेमुळे किंवा सर्जरी नंतर शरीरावरील तणाव वाढल्यासही हर्निया होऊ शकतो.

गर्भवती असताना पोटावर जास्त दबाव पडल्यास.

बद्धकोष्ठामुळे जेव्हा आतड्यांवर तणाव जाणवू लागतो.

जास्त वजन उचलल्याने.

पोटात पाणी होणे किंवा जलोदर.

अचानक वजन वाढल्यामुळे.

शरीरातील एखाद्या भागाच्या सर्जरी नंतर

सतत खोकला किंवा शिंकाच्या त्रासामुळे.

अंबिलिकल हर्नियाची लक्षणं

कोणत्याही हर्नियातील सर्वात सामान्य लक्षण म्हणजे प्रभावित भागात एक गाठ तयार होऊ लागते. इनगुईनल हर्निया च्याबाबतीत जांघेच्या हाडाच्या दोन्ही बाजूला गाठ झाल्यासारखं दिसू लागतं. ज्या ठिकाणी जांघ आणि पोट जोडलेलं असतं. जेव्हा तुम्ही उभे राहता, वाकता किंवा खोकता, तेव्हा स्पर्शाच्या माध्यमातून हर्निया जाणवू लागण्याची शक्यता असते. जर मुलाला हर्निया झाल्यास तो रडताना हर्निया आढळतो. साधारणतः मुलं रडू लागल्यावर पोटाला एक उठाव आलेला दिसेल हे आहे अंबिलिकल हर्नियाचं एकमात्र लक्षण.

इनगुईनल हर्नियाची लक्षण

हर्निया झालेल्या भागात वेदना होणं किंवा बैचेनी जाणवणं (खासकरून पोटाच्या खालच्या भागात), खासकरून जेव्हा तुम्ही वाकता, खोकला आल्यावर किंवा उठताना दबाव किंवा जडपणा जाणवणं. उठाव आलेल्या ठिकाणी जळजळ किंवा उत्तेजना जाणवणे.

हाईटल हर्नियाची लक्षण

अ‍ॅसिड रिफ्लक्स हे तेव्हाच होतं जेव्हा पोटातील अ‍ॅसिडमुळे जळजळ होते. छातीत दुखू लागतं किंवा काही वेळा काहीच लक्षण दिसत नाहीत. कधी कधी हा हर्निया झाल्याचं कळतच नाही. त्यामुळे नियमित शारीरिक चाचणी करणं आवश्यक आहे.

हर्नियाची तपासणी

साधारणतः शारीरिक तपासणीच्या माध्यमातून इनगुईनल हर्नियाची तपासणी केली जाऊ शकते. जेव्हा तुम्ही उभे असता किंवा खोकला आल्यावर तणाव जाणवल्यास डॉक्टर पोटाची तपासणी करतात. जर हाईटल हर्निया असेल तर डॉक्टर बॅरियम एक्स-रे किंवा एंडोस्कोपीने त्याची चाचणी करतात. बॅरियम एक्स-रे मध्ये पचनतंत्राचा एक्स-रे काढला जातो. एंडोस्कोपी मध्ये गळ्याच्या खालील आणि पोटामध्ये एक छोटा कॅमेरा लावला जातो. यामुळे डॉक्टरांना पोटातील अंतर्गत भाग तपासता येतो. जर मुलाला अंबलिकल हर्निया असेल तर डॉक्टर अल्ट्रासाऊंड करून घेण्यास सांगतात. अल्ट्रासाऊंड मध्ये शरीराच्या आतील संरचनाचा फोटो बनवण्यासाठी उच्च प्रतीच्या ध्वनी तरंगांचा उपयोग केला जातो.

हर्नियावरील उपचार

हर्नियावरील उपचारांची गरज आहे की नाही हे हर्नियाचा आकार आणि त्याच्या लक्षणांच्या गंभीरतेवरून ठरतं. हर्नियाच्या उपचारांमध्ये जीवनशैलीतील बदल, औषधं किंवा सर्जरी यासारखे उपाय सामील आहेत.

जीवनशैलीतील बदल

आहारातील बदलांमुळेही बरेचदाहर्नियावर इलाज केला जाऊ शकतो. पण यामुळे हर्निया पूर्णतः बरा होत नाही. जास्त कॅलरीयुक्त जेवण, जेवणानंतर लगेच वाकणे किंवा वळणे टाळा. तसंच शरीराचं वजन नियंत्रणात ठेवा. काही व्यायामांच्या मदतीने हर्नियाच्या आसपासच्या मांसपेशी मजबूत करण्यास फायदा होतो. ज्यामुळे हर्नियाची लक्षणं कमी होतात.

हर्नियावरील सर्जरी

जर हर्निया वाढत असेल किंवा त्यामुळे दुखत असल्यास त्यावरून त्याच्यावर करण्यात येणारे उपाय ठरवले जातात. सर्जरी करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. हर्नियाची ओपन किंवा लेप्रोस्कोपिक सर्जरी करून तो बरा केला जातो. लेप्रोस्कोपिक सर्जरी मध्ये एका छोट्या कॅमेराचा वापर करून आणि सर्जरीची छोटी उपकरणं वापर करण्यासाठी काही छोट्या चिरा देऊन हर्नियाची सर्जरी केली जाते. लेप्रोस्कोपिक सर्जरी केल्यामुळे हर्नियाच्या आसपासच्या उतींना कमी हानी पोचते. ओपन सर्जरी नंतर पुन्हा आरोग्य सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी जातो. यामध्ये कमीत कमी सहा आठवडे चालणं शक्य होत नाही. दुसरीकडे लोप्रोस्कोपीचा रिकव्हरी वेळ खूपच कमी आहे, पण यामध्ये हर्निया पुन्हा होण्याची शक्यता असते. तसंच सर्व प्रकारच्या हर्नियावर लेप्रोस्कोपी करणं शक्य नसतं.

हर्नियामुळे उद्भवणाऱ्या समस्या

जर वेळीच हर्नियावर ईलाज केला नाही तर तो वाढू शकतो आणि जास्त वेदनादायी ठरू शकतो. ज्यामध्ये आतड्यांना बाधा होऊ शकते. विना उपचार हर्निया पोटाच्या आसपासच्या उतींवर अधिक दबाव टाकू शकतो. त्यामुळे सूज येणं किंवा वेदना होऊ शकतात. रक्तप्रवाह थांबून पेशींवर परिणाम होऊ शकतो. त्या मृत होऊ शकतात. त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हर्नियावर तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.

हर्नियावरील घरगुती उपाय

हर्नियावर काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. या उपायांनी हर्निया पूर्णतः बरं होऊ शकत नाही, पण काही प्रमाणात होणाऱ्या वेदना आणि सूज यावर नक्कीच आराम मिळतो.

१) एरंडेल तेल:- हे तेल हे नेहमीच पोटाशी निगडीत आजारांवरील उपाचारासाठी वापरलं जातं. कारण या तेलामुळे पोटात एक पातळ अस्तर तयार होतं, जे पोटात जळजळ होण्यापासून थांबवतं आणि सहज पचन घडवून आणतं. एरंडेल पोटात घेऊही शकता किंवा त्याचा पॅक बनवून पोटावर ठेवून त्याची ऊब घेऊ शकता. वेदनादायी हर्नियावर हा चांगला उपाय आहे. एरंडेल तेलाचा वापर करण्यासाठी रोज एक कप दूधात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला आणि त्याचं सेवन करा.

२) कोरफडचा रस:- कोरफड मध्ये नैसर्गिकरित्या ज्वलनशामक आणि थंडावा देणारे घटक आहेत. हर्निया होण्याची शक्यता टाळण्यासाठी जेवणाआधी कोरफडाचा गर किंवा ज्यूसचं सेवन करू शकता. एक ग्लास पाण्यात दोन चमचे कोरफड ज्यूस मिक्स करा आणि घोट घोट प्या. त्यामुळे हर्नियाच्या वेदना आणि सूज दूर होईल.

३) बर्फाचा शेक:- बर्फ हा हर्नियावरील सर्वात जुना, सोपा आणि प्रचलित उपाय आहे. हर्निया झालेल्या जागेवर बर्फ लावल्याने जरा आराम पडतो, दुखणंही कमी होतं आणि सूजही कमी होते. जर वेदनादायी हर्निया असल्यास बर्फाचा वापर करायला सुरूवात करा. ज्या ठिकाणी हर्निया झाला असेल त्या ठिकाणी बर्फाने शेक द्या. नक्कीच आराम मिळेल. सूज कमी होईल आणि वेदनाही दूर होतील.

४) आल:- आल्याचं मूळं हे पोटातील गॅस्ट्रीक एसिडमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतं. हे हर्नियातील वेदनाही कमी करतं. यातील ज्वलनशामक गुणांमुळे हे प्रभावी आहे. याच सेवन आल्याचा रस (डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रमाण ठरवावं) किंवा कच्च्या आल्याचा तुकडाही खाऊ शकता. जर हर्निया झाला असेल तर नियमितपणे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी आलं घालून उकळलेलं पाणी पिऊ शकता. त्यामुळे नक्कीच आराम मिळेल.

५) भाज्यांचा ज्यूस: हर्नियावरील सगळ्यात सोपा आणि गुणकारी उपाय म्हणजे एक ग्लास भाज्यांचा ज्यूस. ज्यामध्ये गाजर, पालक, कांदे, ब्रोकोली आणि केल यासारख्या भाज्यांचा समावेश असेल. या भाज्यांमधील जीवनसत्त्व आणि ज्वलनशामक गुण हर्नियामुळे होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी करतात. या व्हेजिटेबल ज्यूस मध्ये चिमूटभर मीठ घातल्यास हे अधिक परिणामकारक ठरते. बाजारात उपलब्ध असलेल्या ताज्या भाज्यांचा उदाहरणार्थ पालक, गाजर, ब्रोकोली आणि इतर पालेभाज्या वापरून ज्यूस करून घ्या आणि त्यात चवीपुरतं मीठ घाला. हा व्हेजिटेबल ज्यूस नियमितपणे घेतल्यास बद्धकोष्ठ दूर होऊन शरीरावर पडणारा ताण दूर होईल.

हर्नियापासून बचाव

आपण नेहमीच कमकुवत मांसपेशींना थांबवू शकत नाही, ज्या हर्निया उत्पन्न होण्याचं कारण असतात. पण शरीरावरील तणाव कमी करू शकतो. यामुळे झालेला हर्नियाची वाढ किंवा हर्निया होण्याची शक्यता टाळू शकता. हर्नियापासून बचावासाठी पुढील उपाय करावे.

धूम्रपान करू नका.

सतत येणारा खोकला टाळण्यासाठी डॉक्टरांना दाखवा.

शरीराचं वजन नेहमी आटोक्यात ठेवा. ज्यामुळे पोटावर दबाव पडणार नाही.

लघवी थांबवून ठेऊ नका, त्यामुळे आतड्यांवर ताण येऊ शकतो.

जास्त वजन उचलणं टाळावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात हॉटेल समोरच तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) सणसवाडी (ता. शिरुर) परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण…

2 तास ago

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी; लाखो रुपयांचे दागिने लंपास…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली…

3 तास ago

राष्ट्रहिताला प्राधान्य; शंभूराज देसाईंचा कौटुंबिक युरोप दौरा रद्द

मुंबई: देशातील सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान Narendra Modi यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक…

6 तास ago

आसाममध्ये भाजपची ‘हिस्टोरिक व्हिक्टरी; हिमंता बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक

गुवाहाटी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता…

7 तास ago

साखर आरोग्यास अपायकारक

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय…

9 तास ago

पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध

आलं आरोग्यासाठी फार चांगलं असतं. हे आपल्याला माहिती आहेच. आहारामध्ये आल्याचा समावेश असणे फार फायद्याचे…

9 तास ago