आरोग्य

मोबाईल पकडण्याची योग्य पद्धत कोणती

आजकाल मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल सतत आपल्या हातातच असतो. मोबाईलच्या सतत वापराने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी, झोप न लागणे असे त्रास अनेकांना होतात. पण मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळेही मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अनेकांच्या कायमची मागे लागली आहे.

मोबाईल बघताना शक्यतो आपण आपल्या बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या पोझिशन किंवा बॉडी पोश्चरकडे फारसे लक्ष देत नाही. यामुळे मान, पाठ, कंबर सगळंच आखडून जातं. कोणी पाठीवर झोपून हात वर करून मोबाईल बघतात. यामुळे हात दुखू लागतात, बोटंही आखडून जातात. यासाठीच मोबाईल बघण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती हे आपल्याला माहित असले पाहिजे. त्यामुळे तुम्हालाही मोबाईल खाली दिलेल्या चुकीच्या पद्धतीने पकडण्याची सवय असेल, तर ती लगेच सोडा. अशा पद्धतीने मोबाईल पाहिल्यास आपल्याला मान पाठ आणि कंबरेच्या अनेक समस्या डोकं वर काढून वारंवार त्रास देऊ शकतात

मोबाईल पकडण्याच्या चुकीच्या पद्धती नेमक्या कोणत्या

1) बेडवर पाठ टेकवून झोपायचे आणि दोन्ही हात वर करून हातात मोबाईल पकडायचा, अशी सवय अनेकांना असते. ही सवय अतिशय चुकीची आहे. कारण यामुळे खांद्यावर आणि मानेच्या स्नायूंवर खूप ताण येतो. वारंवार अशा पद्धतीने मोबाईल पकडून बघाल तर मानदुखी आणि खांदेदुखी मागे लागेल.

2) या दुसऱ्या पद्धतीमध्ये अनेक जण एका अंगावर झोपतात. एक हात कोपऱ्यात वाकवून तळहात डोक्याखाली ठेवतात आणि मग दुसऱ्या हाताने मोबाईल बघतात. ही सवयही खांदेदुखी आणि मानदुखी मागे लावणारी आहे. कारण अशा पद्धतीने मोबाईल बघताना जो हात डोक्याखाली ठेवला जातो तो आपण विरुद्ध दिशेने वळवलेला असतो. त्यामुळे खांद्याच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो, मानेचे स्नायूही ताणले जातात.

3) या तिसऱ्या पद्धतीमध्ये पोटावर झोपतात. छातखाली उशी ठेवलेली असते. दोन्ही हात कोपऱ्यात वाकवले जातात आणि मोबाईल पकडला जातो. यामुळे खांदे, हाताचे काेपरे यावर तर ताण येतोच. पण पाठीचा कणा आणि कंबर इथले स्नायूही ताणले जातात. अशा पद्धतीने मोबाईल पाहिल्यास मणक्यात किंवा कंबरेत गॅपही येऊ शकतो. अशा पद्धतीने मोबाईल बघण्याची किंवा पकडण्याची सवय बहुतांश तरुण मुला- मुलींमध्ये बघायला मिळते.

मग मोबाईल पकडण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती

मोबाईल बघताना शक्यतो आपण मोबाईल हातात धरून आपली मान हलकेच पुढच्या दिशेने झुकवून खाली मान करून मोबाईल पाहतो, परंतु ही अतिशय चुकीची पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईल फोन वापरत असाल तर सर्वप्रथम तुमची मान पुढे झुकणार नाही याची काळजी घ्या. फोन बघताना आपली मान नेहमी नैसर्गिक स्थितीतच ठेवा. जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर तुमच्या मानेवर अतिरिक्त दबाव पडणार नाही अशा प्रकारे तो तुमच्यासमोर ठेवा. याचबरोबर, मोबाईल बघताना पोटावर म्हणजेच पालथ झोपा.

पाय गुडघ्यात वाकवून वर उचला आणि हाताचे कोपरे जमिनीला टेकवत, दोन्ही हातात मोबाईल धरून तो पाहा. यालाच garden pose किंवा sphinx pose असंही म्हणतात. ज्यांना तीव्र पाठदुखी आहे, ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांनी या अवस्थेत बसू नये. या पोझमध्ये बसताना खांदे सरळ आणि पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करावा.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

3 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

1 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

1 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

2 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago