आरोग्य

दुधी भोपळ्याच्या भाजीसोबत कशाचं सेवन करू नये

दुधी भोपळ्याची भाजी किंवा पराठे भरपूर लोक आवडीने खातात. यांची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच यातून अनेक पोषक तत्व जसे की, व्हिटॅमिन सी, बी आणि के यांच्यासोबतच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न, झिंकही मिळतं. याने तुमच्या त्वचेसोबतच तुमच्या शरीरालाही अनेक फायदे मिळतात. या भाजीचं सेवन नियमितपणे केल्याने मेटाबॉलिज्मचं मजबूत होतं. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, या भाजीसोबत कशाचं सेवन करू नये, आज तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दुधी भोपळ्यासोबत काय खाऊ नये

दुधी भोपळ्यासोबत पत्ता कोबीचं सेवन अजिबात करू नये असं आयुर्वेद सांगतं. यामुळे तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते. ज्या लोकांना पोटाची समस्या आहे, त्यांना दुधी भोपळ्या सोबत पत्ता कोबी आणि ब्रोकलीचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

तुम्ही दुधी भोपळ्यासोबत कारल्याचं सुद्धा सेवन करू शकता. याने तुम्हाला उलटी होऊ शकते, नाकातून रक्त येऊ शकतं आणि चक्कर येण्याची समस्याही होऊ शकते.

या भाजीसोबत आंबट फळांचं देखील सेवन करणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. याने पोटादुखी किंवा पोटासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. तसेच या भाजीसोबत डेअरी प्रोडक्टही खाणं टाळलं पाहिजे. तसेच

दुधी भोपळ्याचे फायदे

जर तुम्ही नियमितपणे दुधी भोपळ्याच्या ज्यूसचं सेवन केलं तर याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि इम्यून सिस्टीमही बूस्ट होतं. सोबतच तुमचं वजनही नियंत्रणात राहतं. हे ज्यूस तुमच्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं

१) कोलेस्ट्रॉल कमी होत

दुधी भोपळ्याच्या भाजीचं नियमित सेवन केलं तर शरीरातील कोलेस्ट्रॉल सहजपणे कमी होतं. याने कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते. याचा ज्यूस एक आदर्श पेय मानला जातो.

२) यूरिनरी डिसऑर्डर 

यूरिनरी डिऑर्डर म्हणजे लघवीसंबंधी समस्यांमध्ये दुधी भोपळा फार फायदेशीर ठरतो. याने शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी केलं जातं. ते लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं.

३) डायबिटीसमध्ये फायदेशीर

डायबिटीसच्या रूग्णांसाठी दुधी भोपळ्याचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. डायबिटीसमध्ये रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचं सेवन करणं चांगलं असतं.

४) पचन तंत्र मजबूत होत

दुधी भोपळा पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. सोबतच अ‍ॅसिडिटीही दूर केली जाते. तसेच दुधी भोपळ्याने पचनासंबंधी समस्याही दूर होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

4 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

4 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

4 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

4 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

5 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

10 तास ago