CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v80), quality = 55?
पावसाळ्याचे दिवस म्हटले की घरोघर सर्दी, खोकला, घसादुखी असा त्रास असणाऱ्या व्यक्ती दिसतात. लहान मुलांना तर हे इन्फेक्शन खूप लवकर होत. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी पाणी साचून राहाते. त्यामुळे डास होण्याचे प्रमाणही खूप वाढते. अगदी कडाकड डास चावतात. त्यातूनच मग मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया असे आजारही होतात. म्हणूनच आता डास आणि सर्दी- पडसं असा त्रास हे दोन्हीही तुमच्या घरातून पळवून लावयचे असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा.
डास पळवून लावण्यासाठी हल्ली प्रत्येकाच्याच घरामध्ये एक मशिन असते. त्यातील केमिकलमुळे डास घरात येत नाहीत. मशिनचे रिफिल पॅक संपले की आपण ते फेकून देतो. पण तसे करू नका. त्याचाच खास पद्धतीने कसा वापर करायचा पाहा हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा व्हिक्स किंवा झेंडूबाम घ्या. यानंतर त्यामध्ये कापूराच्या २ ते ३ गोळ्या बारीक चुरा करून टाका.
आता या मिश्रणामध्ये अर्धे लिंबू पिळा आणि त्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घाला. हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. यानंतर हे मिश्रण एका डास पळवून लावण्याच्या मशिनच्या रिफिल पॅकमध्ये भरा. आता हा रिफिल पॅक मशिनला लावा आणि मशिन सुरू करा. व्हिक्स, कापूर आणि लिंबू यामुळे डास पळून जातील. खोली बंद केलेली असेल तर फक्त १५ ते २० मिनिट हे मशिन चालू ठेवा आणि नंतर बंद करून टाका.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…