आरोग्य

जखम झाल्यावर धनुर्वात प्रतिबंधक लस का देतात

जखम झाल्यावर धनुर्वात होऊ नये, यासाठी सर्वच डॉक्टर धनुर्वात प्रतिबंधक लसीचे इंजेक्शन देतात. टिटॅनस टॉक्साईड व टीटीचे इंजेक्शन का देतात, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. जखम झाल्यानंतर त्यात रस्त्यावरची, घरातील, शेतातील माती वा इतर घाण जाऊ शकते.

धनुर्वाताच्या जिवाणूच्या बीजावस्था (स्पोर) असतात. हे जंतू विपरीत अवस्थेत जिवंत राहण्यासाठी बीजावस्थेत जातात या अवस्थेत ते उष्णता, कोरडेपणा यांना सहजगत्या तोंड देऊ शकतात. सुयोग्य वातावरण मिळाल्यास या बीजावस्थाचे रूपांतर धनुर्वाताच्या जंतूमध्ये होते. हे जंतू मग एक भयंकर विष निर्माण करतात. या विषाचा परिणाम मेंदूवर व स्नायूवर होतो. यामुळे धनुर्वात या रोगात स्नायू कडक होणे, शरीराची कमान होणे, दातखीळ बसणे, झटके येणे अशा गोष्टी पाहावयास मिळतात. या आजारात मृत्यूचे प्रमाण जरी आता खूप कमी झाले असले तरी, नवजात बालकांमध्ये मात्र मृत्यूचे प्रमाण ८० टक्के इतके आहे. धनुर्वात होऊ नये, यावर एकमेव खात्रीलायक इलाज म्हणजे धनुर्वाताची लक्षणे ज्या विषामुळे दिसतात त्या विषाचा बीमोड करण्यासाठी प्रतिबंधक लस घेणे.

ही लस घेतल्यानंतर सुमारे २१-३० दिवसांत आपल्या रक्तात धनुर्वाताच्या जंतूच्या विषाविरुद्ध कार्य करणारे प्रतिद्रव्य तयार होते. त्यामुळे धनुर्वात होणे टाळता येते. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे: ती म्हणजे, आज घेतलेल्या लसीचा उपयोग महिन्या भरानंतर होतो. धनुर्वाताचा अधिशयन काल काही दिवसांचाही असू शकतो. साहजिकच जखम झाल्यावर घेतलेल्या टीटीच्या लसीमुळे, त्या जखमेमुळे धनुर्वात होणार असेल तर फारसा उपयोग होत नाही. यासाठी काय करावे.

लहान मुलांना दीड महिन्यापासून त्रिगुणीच्या लसी द्याव्या. एखाद्याने कोणतीच लस घेतली नसेल, तर महिन्याच्या अंतराने टीटीची दोन इंजेक्शने द्यावी. त्यामुळे त्याला धनुर्वातापासून ५ वर्षे संरक्षण मिळेल. नंतर दर ५ ते १० वर्षांनी एक इंजेक्शन घ्यावे. अशा प्रकारे आपण केव्हाही होणाऱ्या जखमांपासून उद्भवू शकणाऱ्या धनुर्वाताचा प्रतिबंध करू शकतो. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी (शक्य असेल तेव्हा) बाळंतपणाच्या अपेक्षित तारखेच्या आधी सुमारे महिनाभर यासाठीच टीटीचे इंजेक्शन घेणे गरजेचे असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

12 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

12 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

13 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

18 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

18 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

18 तास ago