आरोग्य

तुमचे दात मोत्यांसारखे चमकतील, फक्त ‘ही’ एक गोष्ट तुमच्या टूथपेस्टमध्ये करा मिक्स

दात पिवळे पडणे कधीकधी चारचौघात लाजिरवाणे ठरते. पिवळ्या दातांमुळे बरेच लोकं बाहेर जाणंही टाळतात. पिवळ्या दातांमुळे तोडांची दुर्गंधीही येऊ लागते. तसेच दात पिवळे पडण्यामागे अनेक कारणे असतात, जसे की योग्यरित्या ब्रश न करणे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी. अशातच लोक दात पांढरे शुभ्र करण्यासाठी महागड्या प्रोडक्टचा वापर करतात. पण त्यांचा काहीसा परिणाम दिसून येत नाही. अशातच तुम्ही या घरगुती उपायांचा अवलंब करा. यासाठी तुम्हाला तुमच्या टूथपेस्टमध्ये फक्त एक गोष्ट मिक्स करून दात स्वच्छ केल्यास तुम्ही मोत्यासारखे पांढरे दात मिळवू शकता.

मोत्यासारखे पांढरे दात मिळविण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही महागड्या प्रोडक्टची किंवा पांढरेपणा आणण्यासाठी उपचारांची आवश्यकता नाही. यासाठी तुम्ही फक्त हळदीचा वापर करा. कारण हळद दात पांढरे करण्यास उपयुक्त आहे.

खरंतर हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा एक पॉवरफूल अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतो. जो दातांचा पिवळापणा दूर करतो आणि दात चमकदार बनवतात.

हळदीमध्ये आढळणारे करक्यूमिन केवळ दात पांढरे करण्यास मदत करत नाही तर सुजलेल्या हिरड्या, पोकळी, प्लेक आणि तोंडाच्या संसर्गासह इतर अनेक दातांच्या समस्यांपासून आराम देते.

दात पांढरे करण्यासाठी हळद वापरणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रशवर टूथपेस्ट घ्यावी लागेल आणि त्यात चिमूटभर हळद टाका. दररोजप्रमाणे दात घासा.

हळदीव्यतिरिक्त, तुम्ही इतर काही नैसर्गिक गोष्टींनी दातांचा पिवळापणा दूर करू शकता. यासाठी बेकिंग सोडा देखील एक चांगला पर्याय आहे. बेकिंग सोड्यात सौम्य अपघर्षक गुणधर्म असतात जे दातांवर जमा झालेला पिवळा थर काढून टाकण्यास मदत करतात.

तुम्ही नारळ तेल देखील वापरू शकता. नारळ तेलात अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे दातांचा पिवळापणा दूर करतात. यासोबतच ते हिरड्या मजबूत करण्यास देखील मदत करते. तुम्हाला फक्त नारळ तेल तोंडात घेऊन 10 मिनिटे फिरवा. अशाने तोंडाच्या संसर्गासह इतर अनेक दातांच्या समस्यांपासून आराम मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

11 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

11 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago