मुंबई: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि Bigg Boss Marathi च्या पाचव्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली Ankita Walawalkar सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अंकिताचे सोशल मीडियावर सुमारे 1.1 मिलियन फॉलोअर्स असून ती विविध सामाजिक विषयांवर मत मांडत समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.
अंकिता म्हणाली की, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि मार्गदर्शन या तीन गोष्टींचा विचार केला तर महाराष्ट्राचे खरे ‘बिग बॉस’ म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असे मला वाटते.यावेळी मराठी भाषेबद्दल बोलताना अंकिता म्हणाली की, प्रत्येकाने आपल्या कुटुंबात मराठी भाषा जपली पाहिजे. इतर भाषांचा आदर करतानाच आपली मातृभाषा टिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बोली भाषांबद्दल विचारले असता अंकिता म्हणाली की, महाराष्ट्रात अनेक बोली भाषा आहेत. बिग बॉसमध्येही वेगवेगळ्या बोली ऐकायला मिळाल्या, काही तर माझ्यासाठीही नवीन होत्या. मालवणीसह अनेक बोली या मराठीच्या उपभाषा आहेत. त्यामुळे विविधता जपत आपण सर्वांनी मिळून मराठी भाषा जपली पाहिजे, असेही ती म्हणाली.
दरम्यान, मराठी चित्रपट किंवा नाटकात काम करण्याची संधी मिळाली तर कोणाला प्राधान्य देशील? असा प्रश्न विचारल्यावर अंकिता म्हणाली की, मला नाटकात काम करायला आवडेल. कारण नाटकातून खूप काही शिकायला मिळते. आणि जर अभिनय जमला नाही, तर भविष्यात निर्मिती क्षेत्रात नक्की काम करेन, असेही तिने सांगितले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…