महाराष्ट्र

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा रंगली आहे.

मंगळवारी वरळी डोम परिसरात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजप महायुतीने मोर्चा काढला होता. ऐन गर्दीच्या वेळी निघालेल्या या मोर्चामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. याचदरम्यान आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघालेली एक महिला या कोंडीत अडकली होती. संतप्त झालेल्या महिलेने गाडीतून उतरून थेट मंत्री महाजन आणि पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारत, “इथून निघून जा, गाड्यांची लांब रांग लागली आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला. मोर्चा खुल्या मैदानात का घेतला नाही, असा सवालही तिने उपस्थित केला.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी वाहतूक कोंडीबद्दल खेद व्यक्त केला. “मी वैयक्तिकरित्या त्या महिलेची माफी मागितली. आम्ही काही मिनिटांत निघणार होतो, मात्र त्या वैतागल्या होत्या. त्यांनी अयोग्य भाषा वापरली आणि रागाच्या भरात बाटली फेकली,” असे त्यांनी सांगितले. तसेच, पोलिसांनी तिच्यावर कठोर कारवाई करू नये, असे निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणात दुसऱ्या दिवशी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. वकील गणरत्न सदावर्ते यांच्या मुलीनेन झेन सदावर्ते यांनी ही तक्रार दिली असून, शासकीय कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी मोर्चा आयोजकांवरही सार्वजनिक गैरसोय केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, संबंधित महिलेची ओळख श्रीमती ग्रेवाल अशी पटली आहे. त्या सुमारे एका तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या आणि आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नीलम गोऱ्हे यांची तातडीची भेट; न्यायासाठी ठाम भूमिका

पालघर: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या…

6 तास ago

अजितदादांच्या कार्याला सलाम! आर्यनसिंह दडियालाचा २१० किमी पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम

मुंबई: ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्याला…

6 तास ago

इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी; येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवित, इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात…

10 तास ago

‘हरलो नाही, राजीनामा नाही’ ममता बॅनर्जी ठाम; कालीघाटातून संघर्षाची घोषणा

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे वळण आले असून Mamata Banerjee यांनी पराभव मान्य…

10 तास ago

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणर; प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card)…

10 तास ago

Video! रांजणगाव MIDC दहशतीत! कामगारांवर हल्ले आणि लूटमारीचे वाढले प्रमाण…

रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरात परप्रांतीय कामगारांवर हल्ले, लूटमार…

12 तास ago