क्राईम

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल हे शिरूर मध्ये आले होते. त्यांना अवैध धंद्यांची माहिती कळतात त्यांनी कठोर भूमिका घेत शिरूर पोलीस ठाणे, रांजणगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीविरोधात पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई करत गुरुवारी (ता. २४) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत देशी-विदेशी दारू, हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन व तयार दारू असा मोठा साठा जप्त करण्यात आला असून एकूण सहा स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरूर पोलिसांनी आंधळगाव येथे छापा टाकून सचिन अनिल पवार (वय २९) याच्याकडून १८० मिलीच्या ९ विदेशी ‘गोल्ड व्हिस्की’ बाटल्या (किंमत १३५० रुपये) तसेच १० देशी ‘टॅंगो पंच’ बाटल्या (किंमत ८०० रुपये) असा एकूण २१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी हा आपल्या घराच्या भिंतीच्या आडोशाला बेकायदेशीर दारू साठवून विक्री करत असल्याचे उघड झाले.

दरम्यान, आण्णापुर (येवलेमाथा) परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत किरण तौकल चौगुले व मंगलाबाई चौगुले यांना लक्ष्य केले. हे दोघे बेकायदेशीर हातभट्टी चालवून कच्च्या रसायनापासून दारू तयार करत असल्याचे आढळले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी झाडाझुडपात पळून गेले; मात्र घटनास्थळावरून ४० लिटर कच्चे व जळके रसायन, भट्टीसाठी वापरले जाणारे साहित्य व ३५ लिटर तयार दारू असा एकूण ५६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच परिसरात प्रतिक पांडुरंग पवार (वय २२) याच्याकडून ५ लिटर तयार गावठी दारू (किंमत ५०० रुपये) जप्त करण्यात आली. तो आपल्या घरामागे लपून ही दारू विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.

आंबळे गावातील ओढ्याजवळ छबु संभाजी पवार (वय ५०) व गणेश प्रकाश पवार यांच्याकडून ३१ लिटर हातभट्टीची दारू (किंमत ३१०० रुपये) जप्त करण्यात आली. हे दोघे पडिक शेतजमिनीच्या बांधावर झुडपांच्या आडोशाला दारू विक्री करताना पकडले गेले. चांडोह येथे पोलिसांनी अवैध्य दारुचा मोठा साठा उघडकीस आणत देविदास उर्फ रामदास नानाभाऊ शिंदे (वय ४२) याच्याकडून तब्बल १९,९०० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. यात विविध कंपन्यांच्या बिअर, व्हिस्की व इतर मद्याच्या बाटल्यांचा समावेश आहे. तो हा साठा विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या ठेवत असल्याचे समोर आले. तसेच चांडोह-लाखनगाव परिसरात भानुदास शिवराम गाडगे हा ६० लिटर हातभट्टी दारूसह आढळून आला; मात्र पोलिसांना पाहताच तो घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील सुमारे ३००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याचा शोध सुरू आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ (ई) तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध पोलिस अधिकारी व अंमलदारांनी स्वतंत्रपणे ही कारवाई पार पाडली असून सर्व कारवाया पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
शिरूर तालुक्यात अवैध दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश कंजळे यांच्याकडून सांगण्यात आले असून, नागरिकांनीही अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर तालुक्यात अनधिकृत दत्तक प्रकरण उघड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर पोलिस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक, हाणामारी, ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल…

शिरूर तालुक्यातील १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

54 मिनिटे ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

56 मिनिटे ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

60 मिनिटे ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

17 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

19 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago