महाराष्ट्र

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणर; प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे. तसेच, NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…

12 तास ago

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…

12 तास ago

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…

15 तास ago

पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…

15 तास ago

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…

15 तास ago

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…

16 तास ago