महाराष्ट्र

महादेव मुंडे प्रकरणात ४ जणांना बेड्या, बडा मासा गळाला लागल्याची शक्यता

बीड: महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एक बडा मासा गळाला लागल्याची शक्यता असून हत्या प्रकरणी चार जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी बीड पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. यामुळे मुंडे हत्या प्रकरणाला आता गती मिळाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

बीडच्या परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ ला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आले आहे. तरी देखील मुख्य आरोपी अद्याप अटकेत नाही. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून चौकशी सुरु असून आता या प्रकरणातबडा मासा गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौकशी सुरू असून संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक रात्रीच रवाना झाले होते. चौकशी सुरू असलेला लोकांची ओळख पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप पर्यंत देण्यात येत नाही.

महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर सुरुवातीचा तपास परळी पोलीस स्टेशनचे पीआय रवि सानप यांच्याकडे होता. सानप आरोपीला अटक करण्यासाठी गेले असता त्यांची लगेच बदली झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर तीन जणांकडून तपास काढून घेण्यात आले. सध्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास आहे आणि शिवाजी बंटेवाड हे प्रमुख आहेत. संशयित आरोपी गोट्या गित्ते याला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. एकूण पाच संशयतांना सध्या ताब्यात घेतल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. एक गोपनीय महत्त्वाचा साक्षीदार आहे ज्याच्याकडे सविस्तर तपास करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

3 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

7 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

9 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago