महाराष्ट्र

मजुराच्या मुलाचा IAS पर्यंत प्रवास; तौसीफ गनी यांची प्रेरणादायी यशोगाथा

पुलवामा: पुलवामा जिल्ह्यातील पुचल या छोट्याशा गावातून आलेल्या तौसीफ अहमद गनी यांनी देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत यश मिळवत IAS अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, ते अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

तौसीफ यांचे वडील मोहम्मद इशाक हे रोजंदारीवर काम करणारे साधे मजूर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही. स्वतः कष्ट करून, अगदी जमीन विकूनही त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी साथ दिली. त्यामुळे तौसीफ यांचं यश हे एका कष्टकरी पित्याच्या त्यागाचं फलित मानलं जात आहे.

तौसीफ यांनी २०२२ मध्ये Veterinary Science मध्ये पदवी पूर्ण केली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली होती. पदवीचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेची तयारी एकत्र सांभाळणं आव्हानात्मक होतं, पण त्यांनी जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले.

UPSC च्या पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये (२०२२ आणि २०२४) त्यांना अपयश आलं. एका टप्प्यावर निराशा आली, पण कुटुंबाचा पाठिंबा त्यांच्यासाठी उभारी देणारा ठरला. त्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन काही महिने एकाग्रतेने अभ्यास केला आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश संपादन केलं.

विशेष म्हणजे, पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांना पुंछ येथे वेटरनरी डॉक्टर म्हणून सरकारी नोकरीही मिळाली होती. नोकरी करत असतानाही त्यांनी UPSCचं स्वप्न जिवंत ठेवलं. अखेरीस त्यांनी ऑल इंडिया रँक २८४ मिळवत IAS कॅडर मिळवण्याचा मार्ग मोकळा केला.

दक्षिण काश्मीरमधील एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं उत्तम उदाहरण आहे. तौसीफ गनी यांची कहाणी अनेक तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

12 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

17 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

19 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

20 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 दिवस ago