महाराष्ट्र

मृत कामगार ‘जिवंत’ करून अनुदान लाटण्याचा बीडमध्ये कोट्यवधींचा घोटाळा उघड

बीड: बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार विभागात मृत कामगारांना जिवंत दाखवून त्यांच्या नावे अनुदान उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना काळात तसेच त्याआधी घडलेल्या या प्रकारात तब्बल 100 ते 200 संशयास्पद प्रकरणे समोर आली असून हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला.

धस यांनी लक्षवेधीद्वारे मांडलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला 2023 मध्ये जिवंत दाखवून त्याने 100 दिवस काम केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. त्यानंतर त्याच व्यक्तीला पुन्हा मृत दाखवून त्याच्या वारसांना सुमारे 2.30 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. विशेष म्हणजे काही नोंदींमध्ये कामगारांनी बुर्ज खलिफा आणि व्हाईट हाऊस येथे काम केल्याचेही दाखवण्यात आले आहे.

या प्रकरणात नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका तसेच काही ग्रामपंचायतींमध्येही बनावट कागदपत्रांद्वारे अनुदान उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 2020 ते 2026 दरम्यानच्या अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत व्यक्तींना जिवंत दाखवून नंतर पुन्हा मृत घोषित करत अनुदान दिल्याचे समोर आले आहे.

या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता सचिव स्तरावरील अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि लाटलेली रक्कम वसूल करावी, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.

दरम्यान, संबंधित खात्याचे मंत्री आकाश फुंडकर यांनीही ऑफलाईन नोंदणी प्रक्रियेदरम्यान अशा अनियमितता घडल्याचे मान्य केले. सध्या ऑनलाईन नोंदणी आणि बायोमेट्रिक प्रणालीमुळे अशा प्रकारांना आळा बसल्याचे त्यांनी सांगितले. काही प्रकरणांची चौकशी सुरू असून संबंधितांकडून पुरावे मागवण्यात आले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago