महाराष्ट्र

लग्नाची तयारी सुरू असतानाच मध्यरात्रीचा थरार! लेकीच्या लग्नाआधीच बिल्डरने स्वतःवर झाडल्या गोळ्या

सुरत: गुजरातच्या डायमंड सिटी सूरतमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. सूरतमधील प्रसिद्ध ‘जॉली ग्रुप’चे प्रमुख आणि नामांकित बिल्डर तुषार घेलाणी यांनी रविवारी पहाटे स्वतःवर गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास तुषार घेलाणी यांनी त्यांच्या राहत्या घरी लायसन्सधारक रिवॉल्वरमधून स्वतःवर एक राऊंड फायर केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच कुटुंबातील सदस्य खोलीत धावले असता तुषार घेलाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. हे दृश्य पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

कुटुंबीयांनी तातडीने तुषार घेलाणी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबीय त्यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलवण्याच्या तयारीत आहेत.विशेष म्हणजे, तुषार घेलाणी यांच्या मुलीचे येत्या ५ फेब्रुवारी रोजी लग्न ठरले होते. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती, पाहुण्यांची ये-जा सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे आनंदाचं वातावरण क्षणात शोकात बदललं आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आत्महत्येसाठी वापरण्यात आलेली रिवॉल्वर ताब्यात घेतली आहे. कुटुंबीयांनी या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला असला तरी पोलिसांनी अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही. सध्या पोलिसांकडून कुटुंबीयांची चौकशी सुरू असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.या घटनेमुळे सूरतच्या व्यावसायिक वर्तुळात आणि सामाजिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

2 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

2 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

2 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

2 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

2 तास ago