महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही; एकनाथ शिंदेंचं 2100 रुपयांचं मोठं आश्वासन

कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं आश्वासन देत महिलांना केंद्रस्थानी ठेवून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. “एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे. लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय मी थांबणार नाही. लवकरच लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जातील,” असं वक्तव्य त्यांनी केलं.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. “ज्या उमेदवाराच्या मागे महिला उभ्या असतात, त्याचा नंबर पहिला लागतो. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज तुमच्याकडे विनंती करायला आला आहे,” असं सांगत शिंदेंनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करत शिंदे म्हणाले, “अशा दुःखाच्या काळातही आम्हाला प्रचारासाठी यावं लागतं. निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या पुढे ढकलता येत नाहीत. आम्ही प्रचार साधेपणाने करतो आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतो.”

संजय मंडलिक एकटे नाहीत – शिंदे

कोल्हापूरच्या मातीचं कौतुक करताना शिंदे म्हणाले, “या मातीला वेगळा सुगंध आहे. संजय मंडलिक तुम्ही एकटे नाहीत, ही जनता तुमच्या सोबत आहे.”“काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे आणि या लढाईत नेहमी जनशक्तीच जिंकते,” असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला.

लाडकी बहीण योजना – 2100 रुपयांचं आश्वासन

“लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय मी थांबणार नाही. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज तुमच्याकडे विनंती करायला आला आहे,” असं म्हणत लवकरच 2100 रुपये देण्याचं आश्वासन शिंदेंनी पुन्हा अधोरेखित केलं.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही पक्षाचा पाया मजबूत करणारी असल्याचं सांगत, “मी आज नेहमीसारखं भाषण करणार नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर प्रचारासाठी आलो आहे,” असंही ते म्हणाले.

नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचं सांगत शिंदे म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आणि एक खासदार आहे. मागच्या वेळी संजय मंडलिक थोडक्यात सुटले, पण पुढच्या वेळी नक्की बरोबर पकडतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

11 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

15 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

16 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago