मुंबई: लक्ष्मी निवास’ मालिकेत गेल्या काही महिन्यांपासून जान्हवी विश्वाच्या घरी ‘तनुजा’ म्हणून राहत असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. जयंतच्या अत्याचारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी जान्हवीने आपली ओळख बदलली असून, जयंतच्या वागणुकीचं संपूर्ण सत्य तिने आता विश्वासमोर उघड केलं आहे.
दुसरीकडे, दळवी कुटुंबाला जान्हवी आपल्याला कायमची सोडून गेली आहे असंच वाटत आहे. लक्ष्मी आपल्या धाकट्या लेकीच्या आठवणीत दिवस-रात्र भावूक होताना दिसते. जान्हवीला देखील आपल्या कुटुंबाची प्रचंड काळजी वाटत असली, तरी जयंतच्या भीतीने तिने आपली खरी ओळख लपवून ठेवली आहे.
मात्र आता या ट्रॅकमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. जान्हवी अजूनही जिवंत आहे हे सत्य जयंतसह संपूर्ण दळवी कुटुंबासमोर उघड होणार आहे. विशेष म्हणजे, नेहमी जयंतला घाबरणारी जान्हवी यावेळी मोठ्या धीराने त्याचा सामना करताना दिसणार आहे.
प्रोमोमध्ये जयंत जान्हवीला भेटण्यासाठी विश्वाकडे येतो आणि “जानू… जानू…” असा आवाज देतो. तेवढ्यात मागून जान्हवी समोर येते आणि जयंत थोडासा घाबरलेला दिसतो. यावेळी जान्हवी ठामपणे म्हणते, “हीच भीती मला तुझ्या चेहऱ्यावर पाहायची होती. जयंत, आता मी सर्वांसमोर येतेय… माझ्यासाठी आणि माझ्या माणसांसाठी!” या संवादानंतर जान्हवी जयंतला चांगलंच रडवणार, हे स्पष्ट होतं.
या प्रोमोला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. “याची गरज होती”, “एक नंबर, आम्हाला हेच हवं होतं”, “जयंतला चांगलंच रडव”, “यालाच म्हणतात प्रोमो”, “टीआरपी नक्की वाढेल”, “जान्हवीचं नवीन रूप खूपच दमदार आहे” अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका ‘झी मराठी’वर दररोज एक तास प्रसारित केली जाते. फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवस जयंत-जान्हवीचा हा थरारक ट्रॅक प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, जान्हवीचं हे नवीन रूप पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती…
शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…
मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…
नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…