महाराष्ट्र

वसमतच्या विकासकामांना गती देण्यासाठी आढावा बैठक; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

वसमत: वसमत विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी हिंगोली राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय सभागृह, वसमत येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैय्या नवघरे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

मनरेगा कामांना गती, थकीत अनुदान तात्काळ जमा करण्याचे आदेश

मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे व कुरण लागवडीच्या कामांना होणारा विलंब टाळण्याचे निर्देश देत लाभार्थ्यांचे थकीत अनुदान त्वरित जमा करण्यास सांगण्यात आले. मस्टर काढण्यातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही आमदार नवघरे यांनी दिला.

शहर स्वच्छतेसाठी डम्पिंग ग्राउंडचा तोडगा

वसमत शहरातील स्वच्छतेसाठी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गंभीर असल्याने तात्काळ जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जागा उपलब्ध होताच घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

आधुनिक भाजी मार्केटमुळे वाहतूक कोंडीवर उपाय

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. जुन्या गोडाऊनच्या जागेवर ‘आधुनिक भाजी मार्केट’ उभारण्याबाबत तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात आली. हे मार्केट लवकरच साकारल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आधुनिक क्रीडा संकुलाला गती

जिल्हा परिषद मैदानावर प्रस्तावित आधुनिक क्रीडा संकुलातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आमदार नवघरे व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

सतिपांग्रा तलावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सतिपांग्रा तलावाची पाहणी करून त्यास पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा मानस आमदारांनी व्यक्त केला. यामुळे वसमत शहरात एक उत्तम विरंगुळा केंद्र विकसित होणार आहे.

सिंचन प्रकल्पांना वेग

पूर्णा बॅरेज, सिद्धेश्वर उपसा जंक्शन, केळी पाझर तलाव व शिरड शहापूर तलावाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. शिरड तलावामुळे १२७ हेक्टर कोरडवाहू जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

डायलिसिस सेंटर तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी

वसमत शहरातील डायलिसिस सेंटर त्वरित सुरू करण्याबाबत आमदारांनी ठाम भूमिका घेतली. तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदे व सुविधा यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

विद्युत समस्यांवर कायमस्वरूपी उपाय

टाकळखोपा (ता. औंढा) येथील १३२ केव्ही वीज केंद्राच्या कामातील अडथळे दूर करून कमी दाबाच्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश वीज विभागाला देण्यात आले.या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

10 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

14 तास ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

16 तास ago

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…

16 तास ago

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…

17 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…

17 तास ago