आरोग्य

तळपायाची, हाताची सतत आग होणे कारणे व उपाय

1) नर्व्हस सिस्टम मध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास.

2) मधुमेहाची शक्यता असल्यास.

3) व्हिटॅमीन बी-१२ ची कमी.

4)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते.

5) लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास.

6) थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास.

7) रक्त वाहिन्या मध्ये संक्रमण झाल्यास.

8) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.

9) फोलिक अ‍ॅसिड किंवा कॅल्शिअमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते.

10) बध्दकोष्ठाचा त्रास पोटसाफ नसेल तरीही.

11) मद्यपानाचे व्यसन.

12) किडनी संबंधित आजार.

13) एखाद्या किटकाचा दंश.

उपाययोजना

1) गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते.

2) नस्य (नाकात दोन दोन थेंब सोडणे).

3) एका मोठ्या टब मध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा-पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते. हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.

4) दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.

5) तुपाची तळपायांना मालिश व भीमसेन कापुर गरम पाण्यात घेतल्यास तात्काळ परिणाम येतो.

6) पायाला कोकम तेल लावायचं. हे तेल कोकणात मिळेल. हे तेल मळकट पांढऱ्या रंगाचं असुन सर्व साधारण खुप घट्ट असतं. हे तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध आहे.

7) कोहळा, पाव किलो साल काढुन, पांढरा दुधी पाव किलो साल काढुन, आवळा गर पाव किलो, आलं १२५ ग्रॅम साल काढुन एकत्रित करून ज्युस करून रोज घेत जा.

8) शतधौत घ्रुत पायाला लावत जा.

9) धने-जीरे पाणी पीत जा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

10 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

15 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago