महाराष्ट्र

काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी चिपळूण येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी चिपळूण येथे पार पडणार असून, या तीन दिवसीय शिबिरात कोकण विभागातील नवनिर्वाचित प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या प्रशिक्षण शिबिराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते आणि विषयतज्ज्ञांकडून उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या प्रशिक्षण विभागाचे अध्यक्ष आशुतोष शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सखोल व व्यवहार्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. लहान शहरे व निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, त्यावरील उपाययोजना, विकासकामांची गुणवत्ता, तसेच नागरी प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा कसा करावा, यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत, या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात राज्यातील इतर विभागांतील नवनिर्वाचित उमेदवारांसाठीही अशाच प्रकारची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) ॲड. गणेश पाटील यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

6 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago