महाराष्ट्र

रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तरुणीवर भुलीच इंजेक्शन देऊन लैंगिक अत्याचार

बलरामपूर: एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. महिलेवर उपचार करण्याच्या बहाण्याने तिला भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर महिला बेशुद्ध पडली आणि नंतर उपचारादरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

संबंधित प्रकरणात रूग्णालयातील आरोपी कर्मचाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पीडितेनं संबंधित प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे घडली आहे.

कर्मचाऱ्यानं इंजेक्शन टोचलं आणि तरुणी बेशुद्ध

पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितलं की, 25 जुलै रोजी बलरामपूर येथील पचपेवडा ठाणे अंतर्गत विमला विक्रम रुग्णालयात ही घटना घडली आहे. गैसडी येथे राहणारी 28 वर्षीय तरुणी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. त्यानंतर रुग्णालयातील पीडितेला तिथल्या एका कर्मचाऱ्याने इंजेक्शन टोचलं आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली. तेव्हाच तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं.

पीडित तरुणी जेव्हा शुद्धीत आली तेव्हा आपलं लैंगिक शोषण झाल्याचं तिला समजलं. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तिची सर्व बाजू ऐकून नराधमावर भारतीय न्यायसंहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणानंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत. रुग्णालयात असलेल्या रुग्णांना इंजेक्शन देण्याची परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पोलीस अटकेत असलेल्या आरोपीची चौकशी करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

2 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

2 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

3 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

3 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

8 तास ago