महाराष्ट्र

MPSC ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू

पुणे: किनगाव (जि. लातूर) येथील एका व्यापाऱ्याचा एकुलता एक २३ वर्षांचा मुलगा छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य लाेकसेवा आयाेग (एमपीएससी) परीक्षेची तयारी गत दीड वर्षापासून करत होता. दरम्यान, ताे मित्रांसोबत कोकणात फिरण्यासाठी गेला असता, ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. मयत युवकाचे नाव महेश रमेश गुट्टे असे आहे.

किनगाव (ता. अहमदपूर) येथील व्यापारी रमेश शंकरराव गुट्टे यांचा मुलगा महेश (२३) गेल्या दीड वर्षापासून छत्रपती संभाजीनगर येथे एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. तो मित्रांसोबत कोकणात चारचाकी वाहनातून फिरण्यासाठी गेला होता. सोबत एक स्पोर्ट बाईकही मित्राने घेतली होती. घाटातील निसर्ग सौंदर्य मोबाइलमध्ये टिपताना महेश हा स्पोर्ट बाईकवरून जात होता.

पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगावला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात गुरुवारी दुपारी स्पोर्ट बाईकचा अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या महेश गुट्टेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर देवकरा येथे रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, चुलते असा परिवार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

4 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

11 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago