महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी

मुंबई: सरकारी कर्मचाऱ्यांना 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू आहे. सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला आणि आता लवकरच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास जर पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो.यामुळे नवीन आठवा वेतन आयोग एक जानेवारी 2026 पासून लागू होईल आणि 31 डिसेंबर 2035 ला हा आयोग समाप्त होणार अशी माहिती जाणकारांकडून हाती येत आहे. अर्थातच सध्याच्या सातवा वेतन आयोगाची समाप्ती 31 डिसेंबर 2025 ला होणार आहे.

दरम्यान केंद्रातील सरकारकडून 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली असून नियोजित वेळेत नवा आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला की राज्य कर्मचाऱ्यांना देखील आठवा वेतन आयोग लागू केला जाईल. अशा स्थितीत आज आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पे स्केल वाईज किती वाढणार याबाबतची माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती वाढणार पगार

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टर नुसार ठरतो. सध्याच्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता. सातव्या वेतन आयोगात याच फिटमेंट फॅक्टरनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 18 हजार रुपये इतका निश्चित करण्यात आला होता तर महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 15 हजार रुपये इतका निश्चित झाला होता. पण आता नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.00× इतका असू शकतो अशी माहिती हाती आली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 30 हजार रुपये होणार आहे.

अर्थातच आठव्या वेतन आयोगात लेवल 1 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार तीस हजार रुपये होईल. तसेच लेवल 2, 3, 4, 5,6,7,8,9,10,11,12,13, 14 आणि 15 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा अनुक्रमे 30 हजार 600, 33 हजार 200, 34 हजार 200, 36 हजार , 39 हजार 800, 43 हजार 400, 51 हजार, 52 हजार आठशे, 58 हजार 400, 60 हजार 200, 64 हजार, 70 हजार 800, 77 हजार दोनशे आणि 83 हजार 600 इतका होणार आहे. तथापि हा एक फक्त अंदाज आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? हे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतरच समोर येणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

2 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

6 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

9 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

10 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

23 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

23 तास ago