शिरूर तालुका

आमदाबाद येथे पार पडला गुणवंतांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा!

शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नुकताच ‘आमदाबाद भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आमदाबाद गावचा ज्या ज्या व्यक्तींनी गावाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाला सन्मान देण्याचा प्रयत्न आमदाबाद ग्रामपंचायत तसेच आमदाबादच्या सरपंच अनिता घुले तसेच आमदाबाद गावचे माजी आदर्श सरपंच पोपट घुले यांच्या विशेष प्रेरणेतून आणि प्रयत्नातून पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉक्टर संदीप सांगळे, गावचे भूषण तहसीलदार पदी विराजमान असलेले प्रदीप पवार, सरपंच अनिता घुले, माजी आदर्श सरपंच पोपटराव घुले, मा. आदर्श सरपंच योगेश थोरात, मा. आदर्श सरपंच प्रकाश थोरात, आमदाबाद नगरीच्या माजी आदर्श सरपंच सोनाली थोरात, आमदाबाद नगरीचे विद्यमान उपसरपंच सविता माशेरे, मा. उप सरपंच प्रदिप साळवे, माजी उपसरपंच कांताराम नऱ्हे, ग्रा .प.सदस्य राजेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनार, ग्रामसेवक यमराज हंगे, मा. मुख्याध्यापक मोहन थोरात गुरुजी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सखाराम थोरात, पोपट जाधव, सतिश थोरात, राजेंद्र माशेरे, सोसायटीचे चेअरमन आबा जाधव, व्हाईस चेअरमन बंडु थोरात व इतरही मान्यवर मंडळी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमांमध्ये सामाजिक शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा विज्ञान साहित्य या क्षेत्रात विशेष नामांकन प्राप्त असणाऱ्या सर्वच नामांकित व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात कचरा व्यवस्था साठी घंटा गाडीच पुजन तर सेवा निवृत आमदाबाद ग्रामपंचायतीचे सेवक सोपान माशेरे यांचाही सन्मान करण्यात आला. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीवर आपल्या गावाची कौतुकाची थाप असावी या प्रेरणेतून हा पुरस्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ह. भ. प. शुभम महाराज थोरात आणि प्रा. ह भ प नवनाथ महाराज माशेरे, डॉ. दत्तात्रय जगताप सर यांनी केले. तर आभार अविनाश सोनार यांनी मानले. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमातून या नगरीमध्ये अतिशय ऊर्जात्मक वातावरण तयार झाले असून, प्रत्येक जण या नगरीचा नावलौकिक पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील अशी प्रत्येक सन्मानार्थी कडून ग्वाही देण्यात येत आहे.

आमदाबाद येथील नितीन थोरात यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर!

आमदाबादच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे बिनविरोध

नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

11 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

20 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

20 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

21 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago