महाराष्ट्र

अजित पवार पहाटेच उतरले रस्त्यावर, पुण्यातील आयटी पार्कमध्ये जाऊन दिले असे आदेश

पुणे: शिक्षणाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहर आयटी सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले. आयटी सिटीमधील हिंजवडी भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दहा मिनिटांचा पावसात हा भाग वॉटर पार्क होत आहे. त्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. त्यामुळे रविवारी पहाटेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रस्त्यावर उतरले. ते थेट हिंजवडीत पोहचले. त्या भागातील समस्या जाणून घेतल्या. तसेच उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

अतिक्रमण काढण्याचे आदेश

रविवारी पहाटे सहा वाजेपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरले. या भागात साचणारे पावसाचे पाणी, रस्त्याची समस्या, वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी अजित पवारच हिंजवडीत आले. यावेळी रस्त्यावर असलेले अतिक्रमण त्यांनी पाहिले. त्यानंतर सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला अजित पवार यांनी दिले. रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.

नाला बुजवत इमारती?

हिंजवडीमध्ये थोडासा पाऊस पडला तरी वॉटर पार्कसारखी परिस्थिती होते. त्या भागाची पाहणी अजित पवार यांनी केली. त्यावेळी त्या ठिकाणी मोठा नाला होतो. तो बुजवत बहुमजली इमारती, कंपन्या बांधल्या गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन मोठे प्रकल्प आणि एक कंपनी यांनी मिळून एक मोठा नाला बुजवल्याचे नागरिकांनी त्यांना सांगितले. त्यामुळे हिंजवडीच्या फेज थ्रीमध्ये थोडा पाऊस पडला तरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साठत असल्याचे लक्षात आले. त्यावर अजित पवार यावर काय कारवाई करतात? हेच पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

मेट्रो प्रशासनला दिल्या सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवार मेट्रो लाईन तीन हिंजवडीची पाहणी केली. प्रस्तावित मेट्रोच्या जिन्याला पर्यायी जिना तयार करा आणि तो रस्त्याच्या बाजूला घ्या, एक आठवड्याच्या आत या ठिकाणी बदल हवा, अशा सूचना मेट्रो प्रशासनावर दिल्या. यावेळी आयटीईन्सकडून अजित पवार यांना समस्या सांगण्यात आल्या. तसेच ज्या रस्त्यावरून पावसामुळे साचलेल्या पाण्यातून पीएमपीएमएलची बस गेली होती, त्या रस्त्यावर अजित पवार रस्त्यावरून चालत गेले. त्यांनी त्या भागाची पाहणी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

4 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

5 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

5 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

5 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

5 दिवस ago