महाराष्ट्र

अजितदादांची कार्यकर्त्यांसाठी शिस्त, निकटवर्तीयांसाठी सूट

मुंबई: राज्याच्या राजकारणात एक नवा विनोद चर्चेत आहे. शिस्त फक्त कार्यकर्त्यांसाठी, पण निकटवर्तीयांना मोकळीक!” अजितदादा नेहमीच कार्यकर्त्यांना कडक शिस्त पाळण्याचे धडे देतात, त्यांना वचनबद्ध राहण्याची शिकवण देतात आणि त्यांच्या चुकांसाठी रागावतात. पण हेच दादा त्यांच्या निकटवर्तीयांच्या बाबतीत मात्र चक्क माफी देतात.

असे म्हणतात, “दादांचा आवाज जसा कडक, तसे नियमही कडक – पण फक्त निवडकांसाठीच!” कार्यकर्त्यांनी जर काही चूक केली, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते, पण दादांच्या निकटवर्तीयांनी भ्रष्टाचार, सत्ता गैरवापर किंवा कुठलेही चुकीचे कृत्य केले, तरी ते सहन केले जाते. हीच ती दुटप्पी भूमिका, जी सध्या जनतेच्या चर्चेचा विषय झाली आहे.

एकच दादा, दोन न्याय. सामान्य कार्यकर्त्यांना कडवी शिस्त नेत्यांचे लाडके मात्र साखरपुड्यासारखे गोड. मी चुकीचं काही सहन करत नाही” म्हणणारे दादा काही निवडकांसाठी मात्र नेहमी मृदू स्वभाव दाखवतात! असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी म्हटले आहे. हा विरोधाभासच सांगतो की, “नियम सर्वसामान्यांसाठी, अपवाद सत्तेच्या जवळच्या मंडळींसाठी. राजकारणात नवा सुविचार झाला आहे. “सत्ता असेल तर शिस्तही माफ, कार्यकर्ता असेल तर चूकही घातक. हे बघून कार्यकर्त्यांनी एक गोष्ट शिकावी – “दादांच्या जवळ राहा, म्हणजे शिस्तही गोड लागेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

12 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

12 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

14 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

18 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

18 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

18 तास ago