आरोग्य

आहाराचे आयुर्वेदातील नियम

असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देईल.

नियम १: आपल्या पोटाचे चार भाग करावेत. त्यातील दोन भाग हे घन आहारासाठी ठेवावेत. एक भाग हा जलासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा, जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो. आहार हा योग्य रीतीने पचला, तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते.

नियम २: सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे. लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त, तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो.

नियम 3: जेवणाआधी आर्धा तास एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवणाच्या मध्ये मध्ये एखादा घोट पाण्याचा प्यावा. त्यामुळे आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जातो.

नियम ४: कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये. अस वारंवार केल्यास मळमळणे, वा छातीत जळजळणे सुरू होते. तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषिले जात नाही. कारण दोन्हींच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.

नियम ५: अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये. पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडतो.

नियम ६: दुपारी जेवणानंतर लगेचच झोपू नये. असे वारंवार केले गेल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते.

नियम ७: दुपारचे जेवण हे सकाळच्या जेवणापेक्षा थोडे कमी असावे, मात्र रात्रीचे जेवण हे लघू असावे आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण करावे. रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणे दिसन येतात.

नियम ८: आहार हा ताजा बनवलेला. फ्रिजमधील थंड नसावा. तसेच फ्रिजमधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते.

नियम ९: पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही, म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये. असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांनादेखील कारणीभूत ठरू शकते. दोन जेवणांमध्ये चार तासांचे अंतर असावे.

नियम १०: प्रत्येक जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे. त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते.

नियम ११: रोजच्या आहारामध्ये तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे. (केवळ फोडणीपुरते नाही) तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करते, प्रतिकार शक्ती कायम ठेवते, तसेच ते एक उत्तम रसायनदेखील आहे. शक्यतो गाईचे तूप हे उत्तम, मात्र घरी बनवलेले म्हशीचे तूपदेखील उत्तम असते.

नियम १२: दूध आणि फळे एकत्र करून घेऊ नये. जसे फ्रुट कस्टर्ड, शिकरण, असे सवयीने वारंवार खाण्यात आले तर त्वचा रोगनिर्मिती होण्यास कारणीभूत ठरू शकते.

नियम १३: अतिकोरडे, अतितेलकट, अतिगरम, अतिशीत, अतिस्निग्ध असा आहार नसावा. सर्व प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला, तर निश्चितच आरोग्य हे उत्तमच राहणार.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

12 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

12 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

13 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

18 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

18 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

18 तास ago