मुंबई: वसतिगृहातील मुलींची प्रत्येकांनी पालक म्हणून सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे,असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय वसतिगृहातील अधिक्षकांसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण आणि प्रेरणादायी कार्यशाळा सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय,चर्चगेट मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते.
याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी , उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर , तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, आयपीएस डॉ.रश्मी करंदीकर, सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक, राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहातील अधिक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.
शासकीय वसतिगृहातील अधिक्षक यांनी आपलं वसतिगृह सुरक्षित आणि सूंदर असण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवावा. वसतिगृहातील मुलींचे आपण पालक म्हणून जबाबदारी स्वीकारावी आणि या कार्यशाळेतुन प्रशिक्षण आणि प्रेरणादायी विचार घेऊन आपल्या वसतिगृहामध्ये सामाजिक जबाबदारी म्हणून कार्य करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी दिल्या.
थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…
केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…