मुंबई: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘राजकीय वळण’ लागल्याचा आरोप करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केली.
MPSC विद्यार्थी परीक्षा प्रक्रिया, पारदर्शकता, भरतीतील विलंब आणि निकालाबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संविधानाचे धडे देण्याऐवजी सरकारने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी शिंदे यांनी केली.
“कलम ३१७ चा संदर्भ देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सरसकट ‘असंवैधानिक’ ठरवता येणार नाही. सरकारला एखादी मागणी चुकीची वाटत असेल, तर त्यावर स्पष्ट आणि कायदेशीर उत्तर द्यावे,” असे शिंदे म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे काँग्रेसचा हात शोधण्याऐवजी MPSC व्यवस्थेतील समस्या सोडवण्यावर सरकारने लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी म्हटले. परीक्षा आणि भरती प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह तसेच वेळबद्ध करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, परीक्षा प्रक्रिया आणि भरतीबाबत विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकार कोणत्या पद्धतीने पाहते, याकडे आता लक्ष लागले आहे.
लिंबू आणि लवंग या दोन्ही गोष्टींचा वापर कशात ना कशात रोज भारतीय घरांमध्ये केला जातो.…
संधीवात, ज्यास इंग्रजीत Arthritis म्हटले जाते. ज्यात सांध्यात सूज आणि तीव्र वेदना होतात. शरीरातील रोगप्रतिकारक…
जसजसं आपलं वय वाढत जातं शरीरही हळूहळू कमजोर होतं. त्यामुळे वाढत्या वयात लवकर थकवा येण्याची…
नागपूर: राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी…
मुंबई : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा…
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान अकोला: कमी पर्जन्यमान आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे…