amravati child
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील एका महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला असून, चारही बाळं आणि माता सुखरुप आहे. चारही बाळ मुली आहेत. बाळांचे वजन कमी असल्याने सध्या त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहे.
पपिता बळवंत उईके (वय 24, रा. दुनी, जि. अमरावती) या महिलेला बुधवारी (ता. 12) सकाळी साडेनऊच्या सुमारास धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर महिलेच्या गर्भाशयात एकापेक्षा जास्त बाळं असू शकतात, अशी शंका डॉक्टरांना आली. पण, महिलेने सोनोग्राफीच केली नव्हती. त्यामुळे डॉक्टरही संभ्रमात होते.
पहिल्या बाळ जन्मानंतर एकापाठोपाठ एक तीन बालकांची प्रसुती झाली. ही बातमी रुग्णालयात पसरल्यानंतर उत्सुकता निर्माण झाली. चारही बाळ मुली असून त्या सुखरुप आहे. शिवाय आईची तब्येतही चांगली आहे. या चारही बालकांचं वजन 1 किलो 300 पेक्षा कमी असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रीती शेंद्र, परिचारिका तेजस्वी गोरे, नंदा शिरसाट यांच्या टीमने महिलेची सुखरुप आणि सुरक्षित प्रसुती केली. ही प्रसूती सोपी नसली तरी डॉक्टरांच्या मेहनतीमुळे आई आणि चारही बालकं सुखरुप असल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
झारखंडमधील महिलेने दिला एकाच वेळी पाच बाळांना जन्म…
दोन महिन्यांपूर्वी झारखंडमधील एका महिलेने एकाच वेळी पाच बाळांना जन्म दिला होता. झारखंडच्या रांचीमधील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) या हॉस्पिटलमध्ये 22 मे रोजी दुपारी अंकिता कुमारी नावाच्या महिलेची प्रसुती झाली होती. 22 मेच्या दुपारी अंकिता कुमारी यांना अचानक प्रसवकळा सुरु झाल्या आणि अर्धा तासाच्या आत त्यांनी एकेक करुन पाच मुलींना जन्म दिला. रिम्समध्ये पाच बाळांचा एकाचवेळी जन्म होण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी एका महिलेने एकावेळी चार मुलांना जन्म दिला होता, पण तो विक्रम मोडित निघाला आहे.
सर्वाधिक बाळांना जन्म देण्याचा रेकॉर्ड…
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार एकाचवेळी सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा रेकॉर्ड मोरक्कोच्या हलीमा सिसे यांच्या नावावर आहे. त्यांनी 2021 साली एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिला. यात 5 मुली आणि 4 मुलं होती.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…