मुख्य बातम्या

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटे पाच वाजता श्रींचा अभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवसभर भक्तांनी श्री महागणपतीचे दर्शन घेत संकष्टीचे व्रत पूर्ण केले.

या निमित्ताने श्री महागणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ वाजता देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य संपन्न झाला. प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने गाभाऱ्याची, तर देवस्थान ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली. श्री महागणपती भजनी मंडळाच्या भजनांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

गणेशभक्त भावेश कामदार यांच्या वतीने भाविकांना केळीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

भाविकांना सुरळीत व जलद दर्शन मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टने स्वतंत्र दर्शनरांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पावसाचा विचार करून मंडपाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या सुविधांमुळे भाविकांना कोणताही त्रास न होता दर्शन घेता आले, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी दिली.

यावेळी मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा सौ. स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके, देवस्थानचे कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

15 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

15 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

15 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

15 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

15 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

15 तास ago