आत्मा मालिकच्या यश जामदारचे राज्यस्तरीय शालेय बेल्टरेसलिंग स्पर्धेत दैदीप्यमान यश

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालाय, पुणे तसेच स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे दि २४ ते २६ मार्च २०२५ दरम्यान ‘राज्यस्तरीय शालेय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग कुस्ती स्पर्धा २०२५’ आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

 

या स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील ७ मल्लांनी पुणे विभागाचे नेतृत्व करत आपला सहभाग नोंदवला होता आणि विशेष अभिमानास्पद बाब म्हणजे मलठण येथील मल्ल यश गणेश जामदार यांनी उत्कृष्ट अशा खेळाचे प्रदर्शन करुन दैदिप्यमान कामगिरी करत ‘सुवर्ण पदक’ पटकावत घवघवीत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. त्याचबरोबर त्याची १ ते ४ मे २०२५ रोजी जयपुर (राजस्थान) या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

या स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू 

१) पै. कार्तिक चव्हाण ४० किलो (सुवर्ण)

२) पै. श्रावण गायकवाड ४५ किलो (सुवर्ण)

३) पै. प्रविण संगमनेरे ६० किलो (सुवर्ण)

४) पै. यश जामदार ६५ किलो (सुवर्ण)

५) पै. समर्थ खेतमालीस ७१ किलो (सुवर्ण)

६) पै. सिद्धेश पाटील ८६ किलो (सुवर्ण)

७) पै. शंतनू सोलवनकर – ८० किलो (सिल्वर)

 

या सर्व पदक विजेत्या मल्लांना सदगुरु आत्मा मालिक माऊली, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक,राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार विजेते गुरुवर्य वस्ताद पै.भरत नायकल (सर) आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पै.विवेक नायकल,NIS कुस्ती कोच पै.राजेंद्र पाटील,NIS कुस्ती कोच पै.अक्षय डांगे तसेच आत्मा मालिक क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक साईनाथ वरपे (सर) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

 

शिरुर तालुक्यातुन ‘यश जामदार’ वर शुभेच्छांचा वर्षाव 

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील ७ मल्लांपैकी पुणे विभागाचे नेतृत्व करणारा पै यश गणेश जामदार हा शिरुर तालुक्यातील मलठण गावचा रहिवासी असुन मल्ल यश जामदार याने उत्कृष्ट अशा खेळाचे प्रदर्शन करुन दैदिप्यमान कामगिरी करत ‘सुवर्णपदक’ पटकावत ऐतिहासिक असे घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच त्याची मे महिन्यात जयपुर (राजस्थान) या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यासाठी हि विशेष अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातुन यश गणेश जामदार याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिरुर तालुक्यातील वयोवृद्ध शेतकऱ्याने महीलांना घडविले मोफत एकविरा देवी तसेच प्रतिशिर्डी चे दर्शन

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी ४ गावठी पिस्तुल, १२ काडतूस, ३ मॅग्झीन जप्त

कारेगाव येथील आठवडे बाजारात शेतकऱ्यांकडुन जबरदस्तीने पैसे वसुली; खंडणीचा गुन्हा दाखल

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

4 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

4 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

4 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

4 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

6 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

6 तास ago