मुख्य बातम्या

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी ४ गावठी पिस्तुल, १२ काडतूस, ३ मॅग्झीन जप्त

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने एक जणावर कारवाई करत ४ गावठी पिस्तुल, १२ जिवंत काडतूस, ३ मॅग्झीन असा एकूण १ लाख ८२ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, दि. २६ मार्च २०२५ रोजी रेकॉर्ड वरील आरोपी सुरज राजेश पाडळे (रा. सोनेसांगवी, ता. शिरुर, जि.पुणे) याच्याकडे अवैध गावठी पिस्तुल असुन तो सध्या त्याच्या राहते घरी सोनेसांगवी येथे आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचांसह सोनेसांगवी येथे जावुन त्याच्या घरी छापा मारला. त्यानंतर कारवाई करुन रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज पाडळे यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता, १) सुरज पाडळे, त्याचा मित्र संकेत संतोष महामुनी (रा. सरदवाडी, ता. शिरुर, जि.पुणे) आणि त्याचे इतर दोन मित्र यांनी मध्यप्रदेश येथे जावून प्रत्येकी एक प्रमाणे चार गावठी पिस्तुल विकत घेतले असून त्यासोबत जिवंत काडतूस व अधिकचे मॅग्झीन आणले असल्याचे सांगितले.

 

त्यानंतर सुरज पाडळे याने त्याच्या कंबरेला खोवलेले गावठी पिस्तुल व इतर तिघांनी त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिलेली गावठी पिस्तुले व काडतुस, मॅग्झीन काढून दिली. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुरज पाडळे याच्या कडुन एकूण ४ गावठी पिस्तुल, १२ जिवंत काडतूस, ३ मॅग्झीन असा एकूण १ लाख ८२ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपी सुरज राजेश पाडळे याच्यासह इतर तिघांवर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police) येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

 

त्यांनी सदरचे अवैध गावठी पिस्तुल खरेदी करण्यामागे व बाळगण्यामागे त्याचा नेमका कोणता हेतु आहे याकरीता पुढील तपास चालु असुन अटक आरोपीस शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि २ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली असुन स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

 

सदर कारवाईतील आरोपी सुरज पाडळे तसेच संकेत महामुनी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वीही आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकडून चालु वर्षात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर कारवाई करत एकूण ७ गावठी पिस्तुल १७ जिवंत काडतुस हस्तगत करणेत आलेले आहेत.

 

कोल्हापुरचे विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्याकडून पुणे ग्रामीण जिल्हयाची वार्षिक तपासणी चालू असुन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेकडुन कारवाई करुन मोठया प्रमाणात अवैध गावठी पिस्तुलचा साठा हस्तगत करण्यात आल्याने पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले आहे.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, अमोल शेडगे यांनी केली आहे.

कारेगाव येथील आठवडे बाजारात शेतकऱ्यांकडुन जबरदस्तीने पैसे वसुली; खंडणीचा गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात गोडाऊनची भिंत पडली अन तीन तासात साखरेची चक्क ३९२ पोती चोरीला गेली

शिरुर; कोयत्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; सात आरोपींना २४ तासांच्या आत अटक 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

11 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago