शिरुर तालुक्यातील वयोवृद्ध शेतकऱ्याने महीलांना घडविले मोफत एकविरा देवी तसेच प्रतिशिर्डी चे दर्शन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील ८७ वर्षीय वयोवृद्ध प्रगतशील शेतकरी रावसाहेब गोपाळा भोरडे, हे मुळचे शिरुर तालुक्यातील कासारी (माळवाडी) चे रहीवाशी आहेत. त्यांचे मुळ गाव कासारी येथे त्यांचे बालपण गेले. त्यांनी अहोरात्र कष्ट करुन निमगाव म्हाळुंगी येथे जमीन खरेदी केली व तिथेच स्थायिक झाले.

 

आपल्या मुळ गावासाठी काही तरी करायचे हि त्यांची इच्छा होती. मुळ गावाशी त्यांची नाळ जोडलेली होती. म्हणून त्यांनी कासारी गावातील महीलांसाठी कोणत्यातरी देवस्थानला सहल काढण्याची इच्छा होती. कासारी गावातीलच रहीवासी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ यांनी रावसाहेब भोरडे यांची भेट घेऊन कासारी गावातील महीला भगीनी यांना कार्ला येथील एकवीरा देवी व मावळ तालुक्यातील शिरगाव मधील प्रतिशिर्डी च्या दर्शनासाठी चे आयोजन केले.

 

त्यानंतर दि २३ मार्च २०२५ रोजी कासारी येथुन ११० महीलांना दोन लक्झरी बस ने कार्ला येथील एकविरा देवी व प्रती शिर्डीचे मोफत दर्शन करुन महीला भगीनी सुखरुप घरी परतल्या, वयोवृद्ध शेतकऱ्याचे दातृत्व पाहून महीला भगीनींनीही त्यांचं तोंडभरुन कौतुक केले. कासारी गावातुन महीलांची सहल तळेगाव दाभाडे येथे पोहोचल्यानंतर, सहलीतील महीलां भगीनींचे माजी राज्य मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी स्वागत केले, माजी राज्य मंत्री यांनी स्वतः स्वागत केल्याने महीला भगीनी भाराऊन गेल्या.

 

त्यावेळी भाजपा किसान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले ,आळंदी नगर परीषेदेचे नगर सेवक तथा गटनेते पांडुरंग वहीले, ग्राहक पंचायत संस्था पुणे चे राज्याध्यक्ष अशोक भोरडे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ, कासारी सोसायटीचे चेअरमन बापुसाहेब नरके, सदस्य पांडूरंग सुर्यवंशी, श्रीकांत नरके व इतर मान्यवर उपस्थित होते.

कारेगाव येथील आठवडे बाजारात शेतकऱ्यांकडुन जबरदस्तीने पैसे वसुली; खंडणीचा गुन्हा दाखल

शिरुर; कोयत्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; सात आरोपींना २४ तासांच्या आत अटक 

शिरुर तालुक्यात गोडाऊनची भिंत पडली अन तीन तासात साखरेची चक्क ३९२ पोती चोरीला गेली