औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून शाहरुखच्या पठाण चित्रपटावरून मोठा वाद सुरूआहे. आधी बेशरम रंग या गाण्यातील भगव्या रंगाची बिकिनी आणि गाण्याचे बोल यावर आक्षेप नोंदवला गेला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने काही बदल सुचवले होते. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनपूर्व तिकीट विक्रीचा विक्रम केल्याने विरोध मावळला असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, अचानक काही ठिकाणी चित्रपटास विरोध सुरु झाला.
औरंगाबाद शहरातल्या सिडको येथील एका मल्टीप्लेक्ससमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरु केली. चित्रपटाचे पोस्टर देखील कार्यकर्त्यांनी फाडले. अभिनेता शाहरुख खान, पठाण चित्रपट हिंदू विरोधी असल्याचा आरोप करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी लागलीच परिस्थिती आटोक्यात आणली.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…