मुंबई: बँकींग क्षेत्रातील विविध प्रश्नावर मागील ४० वर्ष सातत्याने सरकारला जाब विचारणारे विश्वास उटगी यांनी आज गांधी भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विश्वास उटगी यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
“केंद्र व राज्यात भाजपा सरकारचा मनमानी कारभार सुरु असून बँकांच्या कामातही हस्तक्षेप वाढला आहे. काही भांडवलदार बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेले आहेत, भाजपा सरकार त्यांच्यावर काही कारवाई करत नाही. आर्थिक पातळीवरही भाजपा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. भाजपा सरकारच्या बँकींग व आर्थिक क्षेत्रातील मुद्द्यांवर आवाज उठवून सरकारला जागे करण्याचे काम विश्वास उटगी करतील”, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…