क्राईम

शिरूर शहरात बंद घर फोडून दागिने चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गुजरमळा भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना (दि २४) मे रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५ ३० या वेळेत घडली. माधुरी नारायण तरटे (वय 35), रा. गुजरमळा, शिरूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी माधुरी तरटे या कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप कोणत्यातरी वस्तूने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातून 5 ग्रॅम वजनाचे दोन जोड सोन्याच्या कानातले (किंमत अंदाजे 42,000/- रुपये) आणि 2.5 ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे 20,000/- रुपये) असा एकूण 62,000/- रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक जगताप तपास करत आहेत.

प्रभारी अधिकारी श्रीशैल्य चिवडशेट्टी (पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. शहरात सध्या वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने चोरट्याचा लवकरात लवकर छडा लावावा आणि अशा घटना रोखण्यासाठी विशेष पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

17 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago