महाराष्ट्र

चित्रनगरीच्या बाप्पाचे उत्साहात आगमन; ३२ वर्षांची समृद्ध परंपरा

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात `चित्रनगरीच्या बाप्पाचे ‘चे सोमवारी ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमच्या तालावर उत्साहात आगमन झाले. या आगमनाबरोबरच चित्रनगरीतील ३२ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली.

राज्याचा अधिकृत राज्य महोत्सव म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा सर्वत्र उत्साही वातावरण आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा गणेशोत्सव भव्य दिव्य साजरा करण्यात येणार आहे. याकरिता चित्रनगरी गणेशोत्सव समिती कार्यरत आहे.

देशभरात भव्य गणेशमूर्ती व आकर्षक देखावे असलेल्या मुंबईतील गणेशोत्सवाची ख्याती आहे. त्याचबरोबर हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण होणाऱ्या गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीत विराजमान होणारा गणरायही प्रसिद्ध आहे. गेल्या ३२ वर्षांपासून हा गणेशोत्सव चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबरच सर्व कलाकारांच्या श्रद्धेचे स्थान आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरीतील या मानाच्या `चित्रनगरीच्या राजा’ची आज सायंकाळी दिमाखात आगमन मिरवणूक काढण्यात आली. `योद्धा ढोल-ताशा’ पथकाच्या गजराबरोबरच लेझीमच्या सूरात निघालेल्या मिरवणुकीने परिसर दुमदूमून गेला होता. या मिरवणूक सोहळ्याप्रसंगी महमंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, मुख्यलेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे उपस्थित होते. तसेच चित्रनगरीतील अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच मोठ्या संख्येने निर्मिती संस्थेचे कर्मचारी, भाविक मिरवणुकीत सहभागी झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

16 मिनिटे ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

15 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

21 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

21 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

22 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

22 तास ago