महाराष्ट्र

खर्गेंच्या सभास्थळाच्या ‘शुद्धीकरणा’वरून युवक काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये भाजप कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद मुंबईत उमटले. या घटनेचा निषेध करत मुंबई युवक काँग्रेसने दादर येथील भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळत भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी विचारसरणीचा निषेध केला.

यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जातीय भेदभावाच्या मानसिकतेविरोधात संताप व्यक्त केला. ‘खर्गेंचा अपमान म्हणजे दलित, वंचित समाजाचा अपमान’ अशी भूमिका घेत युवक काँग्रेसने सामाजिक समतेच्या मुद्द्यावर भाजपवर निशाणा साधला.

झीनत शबरीन म्हणाल्या, “मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करणे ही जातीयवादी मानसिकतेची पराकाष्ठा आहे. हा केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान नसून देशातील कोट्यवधी दलित, वंचित आणि शोषित नागरिकांचा अपमान आहे.”भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जात-पात आणि अस्पृश्यतेच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींविरोधात युवक काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“भारतीय संविधानाने समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये दिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात जातीय भेदभाव आणि मनुवादी विचारसरणीला स्थान नाही. संविधानाच्या मूल्यांचे रक्षण आणि सामाजिक समतेसाठी युवा काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल,” असा निर्धार शबरीन यांनी व्यक्त केला.

या आंदोलनात मुंबई युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसैन शेख, महासचिव आसिफ खान, संतोष गुप्ता, ईशान्य मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष शेखर जगताप, दक्षिण मध्य मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा ढवळे, उत्तर मुंबई युवा काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष अजयकुमार मिश्रा, उत्तर-पश्चिम मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष शिव यादव, कार्यकारी अध्यक्ष अब्दुल समद यांच्यासह प्रदेश, जिल्हा आणि विधानसभा स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

4 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

4 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago